IMPIMP

Pune Crime | कोंढव्यात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 7.5 लाखाचे मेफेड्रॉन जप्त

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime branch arrests two drug peddlers in Kondhwa seizes Mephedrone worth 7.5 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मेफेड्रॉन Mephedrone (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या (Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने (Anti Narcotics Cell) मुंबई (Mumbai) येथील आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून 7 लाख 56 हजार रुपये किमतीचे 54 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी. M.D.) जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) एन. डी. पी. एस. अ‍ॅक्ट (N. D. P. S. Act) कायद्यानुसार गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सरफराज इकबाल मेमन Sarfaraz Iqbal Memon (वय – 42 रा. रंगोली कॉम्प्लेक्स, मुंबई), अन्सारी झामिर अहमद अब्दुल खालीक Ansari Zamir Ahmad Abdul Khaliq (वय – 43 रा. मोहम्मद उमर रज्जब रोड, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. 12) करण्यात (Pune Crime) आली. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की, मुंबई येथील दोनजण खडी मशीन चौकातील शिवशंभो वडेवाले हॉटेल (Shivshambho Wadewale Hotel) समोरील सार्वजनिक रोडवर मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडीत घेतली असता 7 लाख 56 हजार रुपये किमतीचे 54 ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. पोलिसांनी आरोपींकडून 40 हजार रुपये रोख, 23 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, 7.56 लाख रुपयांचे मेफेड्रॉन असा एकूण 8 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad),
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle), पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके (PSI S. D. Nrke),
पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, साहिल शेख, आझीम शेख, योगेश मांढरे, नितीन जगदाळे,
युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली.
पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय वागरे (PSI Vijay Wagre) करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title : – Pune Crime | Pune Police Crime branch arrests two drug peddlers in Kondhwa seizes Mephedrone worth 7.5 lakhs

हे देखील वाचा :

Swatantryacha Amrut Mahotsav | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून दौडचे आयोजन

Chandrasekhar Bawankule | भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

Udayanraje Bhosale | आत्मचिंतन केलं असतं तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती; उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Related Posts