IMPIMP

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Unlicensed Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे
शाखा युनिट तीनच्या पथकाने (Pune Police Crime Branch) अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी मंगेश दादु सोनावणे Mangesh Dadu
Sonawane (वय – 26) त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल (Pistol) आणि एक जिवंत काडतुस (Cartridge) जप्त केले (Pune Crime) आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मंगेश दादु सोनावणे (वय –  26 रा. मु. आगळंबे पोस्ट कुडजे, ता. हवेली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) कलम – 3 (25) व महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act) कलम 37 (1) (3) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime)

युनिट तीनचे पथक उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार मंगेश सोनावणे हा कोंढवे – धावडे (Kondhve – Dhavade) येथे पिकॉक लॉज समोर उभा असून त्याच्याकडे देशी बनावटी पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक पिस्टल आणि एक काडतूस मिळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून 40 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan), महिला पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पवार (PSI Tejaswi Pawar), पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, संजीव कंळबे, विल्सन डिसोझा, राकेश टेकावडे, दिपक क्षिरसागर, ज्ञानेश्वर चित्ते, कल्पेश बनसोडे, प्रताप पडवाळ, सतिश कत्राळे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली.

Web Title :-  Pune Crime | Pune Police Crime Branch arrests unlicensed pistol criminal

हे देखील वाचा :

Shweta Tiwari Latest Video | श्वेता तिवारीनं आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना केलं घायाळ, व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर लावली आग

Pune Crime | गुन्हे शाखेकडून सोमवार पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा, आप्पा कुंभारसह 13 जणांवर FIR

Chitra Wagh | पीडितेने केलेल्या आरोपांनंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Related Posts