IMPIMP

Pune Crime | पुण्यातील चंदननगर परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा ! 40 जणांवर कारवाई; साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Clashes with policemen who went to arrest warrants in POSCO case runs away with car

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील चंदननगर परिसरातील (Chandan Nagar) रॉकी व विकी अ‍ॅन्थोनी यांच्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) छापा टाकून 40 जणांवर कारवाई केली. या कारवाई साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई (Pune Crime) सोमवारी (दि.27) करण्यात आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

चंदननगर परिसरातील समर्थ नगर मध्ये पत्र्याच्या शेडमध्ये, इमारतीच्या खोलीत व बाहेर दुचाकीवर बसून कल्याण मटका व इतर जुगार, पैशावर खेळत व खेळवले जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री साडे आठच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी कल्याण मटका व इतर जुगार खेळणाऱ्या 27 खेळवणारे 6 जणांना ताब्यात घेण्यात आले. कारवाई दरम्यान जुगार अड्डा मालक व इतर 5 जण पळून गेले. ताब्यात घेण्यात आलेल्या आणि फरार आरोपींविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार (Maharashtra Gambling Prevention Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

दुचाकीवर कल्याण मटका घेणारे  

विश्वनाथ बापुराव तिवार (वय – 32 रा. खराडी), विजय गौतम संकपाळ (वय – 49 रा. चंदननगर), सुरज कलसिंग अभंग (वय – 43 रा. कंजारभाट वस्ती, येरवडा)

पत्रा शेड आणि इमारतीच्या खोलीत जुगार घेणारे रायटर

शरिफ इस्माईल शेख (वय – 35 रा. जुना बाजार, पुणे), दत्ता श्रीमंत गायकवाड (वय – 42 रा. खराडी), संदीप भगवान चौधरी (वय – 42 रा. लोणीकंद)

फरार जुगार अड्डा मालक

व्हीक्टर उर्फ विकी डॅनियल अ‍ॅन्थोनी Victor alias Vicky Daniel Anthony (वय – 41 रा. खराडी), लॉरेन्स उर्फ रॉकी Lawrence alias Rocky (रा. खराडी)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पैशावर मटका खेळणारे आरोपी

सुरेश बबन शिंदे (वय – 43), महावीर मल्हारी माने (वय – 32), चेतन ज्ञानेश्वर दोरके (वय – 22), जावेद तोलादी बागवान (वय – 35), सुरेश देवचंद डोंगरे (वय – 42), पंजाब रामभाऊ शिरसाठ (वय – 37),अरुण राणु अवचित्ते (वय – 36), तोहिम फय्युम शेख (वय – 18), जालिंदर केरु घोरपडे (वय – 30), विकास कल्याण धुरंदर (वय – 22), नागेश शिवाजी वन्नाळे (वय – 26), ज्ञानेश्वर विजय सोनवणे (वय – 28), संजय प्रल्हाद शेट्टी (वय – 38), कमलाकर शिवाजी गवळी (वय – 42), कैसर लतीफ शेख (वय – 40), अनिल वसंता दिगोळे (वय – 38), सुरेश गोपाळ इंगळे (वय – 55), सुनिल दगडु राठोड (वय – 37), संतोष हरिदास इंदलकर (वय – 31), शरद हरिदास मुटे (वय – 30), अजय ज्ञानेश्वर खलसे (वय – 22), शंकर रामा लष्करे (वय – 31), साहेबराव सिताराम मस्के (वय – 55), नागाप्पा रामा मस्के (वय – 25), संदिप चंद्रकांत थोरात (वय – 60), सुब्बा रेड्डी (वय – 48), चंद्रकांत महादेव राऊत (वय – 27)

जुगाऱ्यांचा नवा ‘जुगाड’ मोबाईलवर घेतला जातो मटका

मागील काही दिवसापासुन सामाजिक सुरक्षा विभागाकडून धाड सत्र सुरु असल्याने जुगार चालकांनी नवीन शक्कल लढवून मोबाईल जुगार सुरु केला आहे.
यात जुगार रायटर हा एखाद्या रिक्षात किंवा दुचाकीवर बसुन खेळी कडून मटका व रक्कम स्विकारतो.
पोलीस कारवाईची खबर लागल्यास त्याच गाडीवरुन पसार होतात.
मात्र सोमवारी केलेल्या कारवाईत ज्या दुचाकी वरुन मोबाईल मटका खेळला जात होता, त्या दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस अंमलदार राजश्री मोहिते, निलम शिंदे, इरफान पठाण, हणमंत कांबळे तसेच तीन परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक यांच्या पथकाने केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 
Web Title :-Pune Crime | Pune Police Crime Branch raids gambling den in Chandannagar area of Pune Action on 40 people Three and a half lakh items confiscated

Related Posts