IMPIMP

Pune Crime | पुण्यात सॉफ्टवेअर अभियंत्याचा गोळ्या झाडून खून झाल्याचे उघड; पोलिसांकडून IT इंजिनिअर च्या दोघा मित्रांना अटक, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | Company robbery gang jailed, Unit Six performance; 12 Crime detection

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | कोंढव्यातील सॉफ्टवेअर अभियंत्याने (software engineer murder case of kondhwa) कौटुंबिक कारणावरुन स्वत: गोळी झाडून घेऊन आत्महत्या (Suicide) केली असल्याचा संशय व्यक्त केला गेला असतानाच त्याला कलाटणी मिळाली असून कोंढवा पोलिसांनी या अभियंत्याच्या दोघा मित्रांना अटक (Pune Crime) केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सागर दिलीप बिनावत Sagar Dilip Binavat (वय ३३, रा. श्रद्धानगर, कोंढवा) आणि दत्तात्रय देवीदास हजारे Dattatray Devidas Hajare (रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेश तारळेकर software engineer ganesh tarlekar (वय ४७, रा. सन फ्लॉवर सोसायटी, कोंढवा) असे खून झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.

याप्रकरणी स्फुर्ती गणेश तारळेकर (वय ४२, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (८८४/२१) दिली आहे. ही घटना ११  ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्यापूर्वी घडली (Pune Crime) आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश तारळेकर हे विवाहित असून त्यांना एक १४ वर्षाचा मुलगा आहे.
कौटुंबिक भांडणामुळे त्यांची पत्नी मुलासह एक वर्षापासून स्वत:च्या वडिलांकडे राहत आहेत.
गेल्या रविवारी दुपारी गणेश तारळेकर हे आपल्या दोन मित्रांसह घरात पार्टी करीत होते.
त्यावेळी गणेश यांनी पिस्तुल काढून आत्महत्या (Suicide) करणार असल्याचे सांगत गोळी झाडून आत्महत्या केली.
या प्रकाराने दोघे मित्र घाबरुन गेले. ते तारळेकर यांना तसेच घरात टाकून पळून गेले.
दुसर्‍या दिवशी दुपारी त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली.
कोंढवा पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता तारळेकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

जवळपास एक दिवस त्यांचा मृतदेह घरात पडून होता. या घटनेच्या दोन दिवस अगोदर गणेश तारळेकर यांनी त्यांच्या सासर्‍यांना फोन करुन आपण  आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली होती. तशी तक्रार त्यांनी कोंढवा पोलिसांकडे केली होती. या दोघा मित्रांनी सांगितलेली हकीकत आणि या घटनेच्या दोन दिवस अगोदरची घटना आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांना येत होता. मात्र, याबाबत केलेल्या तपासात वेगळी माहिती पुढे आली. दारु पार्टी करीत असताना या दोघा मित्रांनी संगनमत करुन कोणत्यातरी कारणावरुन तारळेकर यांच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून त्यांचा खून केला व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पिस्तुल विहिरीत फेकून दिल्याचे उघड झाले. तारळेकर यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दोघांना अटक (Pune Crime) केली आहे. पोलीस निरीक्षक जानकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pune Crime | pune police solve software engineer murder case of kondhwa; police arrest sagar binavat and dattatray hajare friends of IT Engineer ganesh tarlekar

हे देखील वाचा :

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल, डिझेलबरोबरच आता CNG च्या दरवाढीचा ‘भडका’ ! जाणून घ्या आजचे नवे दर

Best Investment Plans For Women | घरगुती महिला सुद्धा बनू शकतात चांगल्या गुंतवणुकदार, इन्व्हेस्टमेंटच्या सवयीने होईल ‘लाभ’

New IT Law | सरकार नवीन IT कायदा आणण्याच्या तयारीत ! बिटकॉइन, गोपनीयतेवर राहिल विशेष लक्ष – रिपोर्ट

Related Posts