IMPIMP

Pune Crime | पुण्यातील संतापजनक घटना ! तिनं विचारलं पोलीस भरतीबाबत ! पोलिसानं डायरेक्ट न्यूड होऊन केला व्हिडीओ कॉल

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime |  पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील एका विवाहितेला पोलीस भरतीमध्ये (Police Recruitment) मदत करण्याच्या उद्देशाने तिच्यासोबत अश्लील चॅटिंग (Porn Chatting) केली. तसेच व्हिडीओ कॉल करुन नग्न (Nude Video Call) होऊन विक्षिप्त प्रश्न करणाऱ्या एका वाहतूक पोलीस हवालदाराविरुद्ध (Traffic Police Constable) जुन्नर पोलीस ठाण्यात (Junnar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पुणे पोलीस (Pune Police) दलात खळबळ (Pune Crime)  उडाली आहे. गणेश बाळू जोरी (Ganesh Balu Jori) असे या हवालदाराचे नाव आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पीडित महिलेने थेट पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांच्याशी संपर्क साधून जुन्नर पोलीस ठाण्यात धाव घेतली अन् वाहतूक पोलीस हवालदार गणेश जोरी यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. पीडित 29 वर्षीय विवाहित महिलेने डीएड केले असून ती विविध ठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाचे काम करते. एका वृत्तपत्रामध्ये तिने पोलीस भरतीची जाहिरात वाचली होती. 15 जूनला पोलीस भरती आहे त्यासाठी तिला मदत हवी होती. यासाठी तिने आपल्या आईकडून जुन्नर मधील काही पोलिसांचे नंबर घेतले होते. (Pune Crime)

पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन (Police Recruitment Guide) करावे असे फोनद्वारे संपर्क करुन विचारले होते. मात्र, या दरम्यान 3 जून रोजी जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गणेश जोरी याला पीडित महिलेने मोबाईलवर फोन करुन भरतीबाबत मार्गदर्शन करा, अशी विनंती केली. गणेश जोरी याने 6 जून रोजी रात्री बाराच्या सुमारास व्हॉट्सअ‍ॅप मेसेज (WhatsApp Message) करुन आणि फोन करुन पोलीस भरतीच्या शारीरिक तपासणीबाबत (Physical Examination) बोलायला सुरुवात केली.

यामध्ये त्याने पहिल्यांदा तुमचा फोटो पाठवा, तुमचे वजन किती ? उंची किती ? असे म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला अंगावर दूध पाजता का ? तुमच्या ब्राची साईज काय आहे ? तुम्ही लूज ब्रा वापरता का ? पोलीस प्रशिक्षणामध्ये (Police Training) रनिंग करावी लागते त्यामुळे तुम्हाला टाईट ब्रा घालावी लागेल. तुमच्या पायाच्या मांड्या एकमेकांना घासतात का असे अश्लील भाषेत बोलला. मात्र पोलीस भरतीसाठी तो एक शारिरीक चाचणीचा भाग असेल असे समजून पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

7 जून रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पुन्हा जोरी याने पीडित महिलेला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करुन वैयक्तिक माहिती विचारण्यास सुरुवात केली.
तेव्हा तुमचे आणि तुमच्या नवऱ्याचे पटत नाही का ? एकटेच राहता का ? तुमच्या नवऱ्याचे बाहेर काही चालू आहे ? असेल तर ते कसे ओळखायचे ? तुमचा नवरा सेक्स करताना तुमच्यावर तुटून पडतो का ? जर तो तुटून पडत असेल तर त्याचे बाहेर अफेअर चालू असेल. असे समजा आणि मला सांगा की रोज तुम्ही किती वेळा सेक्स करता.
यावर पीडितेला लज्जा उत्पन्न झाली आणि तिने मुलगी रडत आहे असे सांगून फोन कट केला.

मात्र, त्यानंतर अंगात कोणतेही कपडे न घालता व्हिडिओ कॉल केला. त्यावेळीही तो अशाच प्रकारे बोलू लागला.
तेव्हा पीडितेने फोन कट केला. रात्री बाराच्या सुमारास पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला आणि पीडितेसोबत असेच अश्लील बोलू लागला.
तेव्हा पीडितीने पुन्हा फोन कट केला. त्यानंतर त्याने मेसेज केला, त्या मेसेजला पीडित महिलेने नॉर्मल रिप्लाय दिला.
जोरी हा व्हिडीओ कॉल करताना त्याने त्याच्या अंगात कपडे घातलेले नव्हते, तो बोलताना त्याच्या छातीवर हाताने चोळत होता.
हे पीडितेला खटकले आणि पीडितेने फोन कट केला.

अखेर 8 जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करुन माफी मागितली आणि तुम्ही माझ्याशी बोला वगैरे मेसेज केले.
या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने थेट पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून जुन्नर पोलीस ठाण्यात गणेश जोरी विरोधात तक्रार दिली.
या प्रकारामुळे हादरलेल्या पीडितेने आरोपी हवालदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | Pune rural police constable made nude video call to young woman tragic incident in pune crime news

हे देखील वाचा :

Eknath Khadse | ‘गाफील राहिल्याने राज्यसभेत पराभव, विधानपरिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज’ – एकनाथ खडसे

Pune PMC News | पुणे महापालिका मुख्य लेखा अधिकारी उल्का कळसकर आणि कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर झाले सह महापालिका आयुक्त

Pune PMPML News | मेट्रोला पूरक नळस्टॉप- कर्वेनगर- नळस्टॉप पीएमपी तोट्यात ! 120 अंतर धावूनही केवळ 350 रुपये उत्पन्न

Related Posts