IMPIMP

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची पहिली कारवाई

by nagesh
 Pune Police Crime News | Police Commissioner Ritesh Kumar's special campaign against pune criminals, preventive action against 3 thousand 700 criminals

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | विश्रामबाग, दत्तवाडी, फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई (Pune Crime) करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) केलेली ही पहिलीच कारवाई आहे.

उमेश वसंत जंगम (वय-25 रा. नारायण पेठ, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह विश्रामबाग (Vishram Bagh Police Station), दत्तवाडी (Dattawadi Police Station) व फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, पालघन, लोखंडी रॉड या सारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), सदोष मनुष्यवध, दिवसा व रात्री घरफोडी (Burglary), गंभीर दुखापत करणे, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा निर्माण झाली होती. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आरोपीवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Senior Police Inspector Shabbir Syed) यांनी वरिष्ठांच्या मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात (Kolhapur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे (P.C.B. Crime Branch Senior Police Inspector Surekha Waghmare) यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Pune’s staunch criminal lodged in Kolhapur Jail, CP Ritesh Kumar’s first action under MPDA Act

हे देखील वाचा :

Sadabhau Khot | ‘रोहित पवार सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेत;’ सदाभाऊ खोत यांची रोहित पवार यांच्यावर टीका

Pune Crime News | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार, महिलांसह 8 जणांवर FIR; नाना पेठेतील घटना

MPSC Student Agitation | एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून आनंदाची बातमी; नवीन अभ्यासक्रम होणार २०२५ पासून लागू

Related Posts