IMPIMP

Pune Crime | बिल्डरला मागितली 1 कोटींची खंडणी; भ्रष्टाचारविरोधी ‘गांधीगिरी’ जनआंदोलनाच्या तोतया वकिलासह चौघांविरुद्ध FIR दाखल

by nagesh
Cheating

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | स्वत:ला भ्रष्टाचार विरोधी गांधीगिरी जनआंदोलनाचा सदस्य म्हणविणारा व जनहित याचिका दाखल करुन बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागणारा तोतया वकिल राजेश बजाज (Rajesh Bajaj) याचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध जनहित याचिका दाखल करुन ती मागे घेण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने राजेश बजाज (Rajesh Bajaj) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल (Rajesh alias Bobby Khairatilal) बजाज ऊर्फ सचदेव (Bajaj alias Sachdev) (रा. अकुर, कमला नेहरु पार्कसमोर, डेक्कन जिमखाना), के. अ‍े. कुरेशी ( K. A. Qureshi) (रा. मलकाजी वाडा, खडकी बाजार), अशोक शंकरराव जाधव (Ashok Shankarrao Jadhav)
(रा. राजा बंगलो, खराडी) आणि बापू गोरख शिंदे (Bapu Gorakh Shinde) (रा. नर्‍हेगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

हा प्रकार एप्रिल २०१५ ते २४ जुलै २०१९ दरम्यान शिवाजीनगर कोर्ट गेट नं. ३ च्या समोर रोडवर घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी कोथरुडमध्ये राहणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीची एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे बोपोडी येथील बांधकामाची परवानगी चुकीची आहे, याबाबत राजेश बजाज व इतरांनी मुंबई हायकोर्टात सिव्हील अ‍ॅप्लीकेशन केले होते. त्यावेळी तिघांनी १४ सप्टेंबर २०१६ रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात तिघांनी २० ते ३०  ऑगस्टपर्यंत राजेश बजाज यांना डेंग्यु झाला व त्यांना बेड रेस्ट घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच के अ‍े कुरेशी यांना व्हायरल संक्रमण झाले असल्याने सुनावणीच्या वेळी हजर राहू शकले नसल्याचे नमूद केले. त्या तिघांनी सादर केलेले मेडिकल प्रमाणपत्र हे बनावट करुन दाखल केल्यामुळे कंपनीची व कोर्टाची फसवणुक केली आहे. तसेच हायकोर्टात जनहित याचिकेची फेरसुनावणी करण्याकरीता केलेल अर्ज मागे घेणेकरीता ऑगस्ट २०१८ मध्ये शिवाजीनगर कोर्ट गेट नं. ३ च्या समोर रोडवर त्यांनी १ कोटी रुपयांची मागणी करुन, शिवीगाळ करुन कंपनीसह फिर्यादी व फिर्यादीच्या कंपनीचे डायरेक्टर यांना संपवेन अशी धमकी (Pune Crime) दिली होती.

या चौघांनी आम्हाला जीवे मारण्याची व कंपनीच्या कामकाजामध्ये अडथळे निर्माण करण्याची धमकी देऊन आमच्या विरोधात विनाकारण न्यायालयात अर्ज करीत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्या भितीपोटी आम्ही तक्रार दिलेली नव्हती.
पंरतु, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याबाबत प्रसारमाध्यमातून समजल्याने आम्ही त्याने दिलेल्या त्रासाबाबत त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलो
असल्याचे गोखले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
गोखले यांच्या फिर्यादीनुसार राजेश बजाज याच्यासह चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध बिल्डरला ५० लाखांची खंडणी मागून जबरदस्तीने फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राजेश बजाज व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजेश बजाज याने अनेकांची यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी राजेश बजाज याच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे.
याशिवाय  बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने राजेश बजाज याला यापूर्वी अटक केली होती.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (PI Balaji Pandhare) आणि त्यांच्या पथकाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Pune Crime | Ransom of Rs 1 crore demanded from builder; FIR filed against four persons

हे देखील वाचा :

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 192 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | बिबवेवाडी, धनकवडी येथील पुनर्वसन योजनेतील निवासी गाळे हस्तांतरणास सर्वसाधारण सभेची मंजुरी; परंतू…

Thackeray Government | महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार – ठाकरे सरकार

Related Posts