IMPIMP

Pune Crime | पुण्यात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट जिन्स पँटची विक्री, 25 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime |  नामांकित कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची (Jeans Pants)  विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) उघडकीस आला आहे. पोलिसांनी व्यवसायिकावर गुन्हा (FIR) दाखल करुन तब्बल 25 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी पिंपरी कॅम्प (Pimpri Camp) मधील साई चौकातील (Sai Chowk, Pimpri) जीन्स पॉईंट बाय लेजेंड्स (Jeans Point by Legends) व लेजेंड्स चॉईस मेन्स वेअर (Legends Choice Mens Wear) या दोन दुकानावर (Pune Crime) करण्यात आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी इस्माईल इस्तेखार खान Ismail Istekhar Khan (वय-26 रा. एसएनबीपी शाळेसमोर (SNBP school), मोरवाडी, पिंपरी) याच्याविरुद्ध कॉपीराईट कायद्यानुसार (Copyright Law)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महेंद्र सोहन सिंग Mahendra Sohan Singh (वय-36 रा. कसबा पेठ, मुळ रा. बिरोलीया, राजस्थान)
यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे  एलजीएफ डिफेन्स कलनी कंपनीत (LGF Defense Company) तपासणी अधिकारी (Investigating Officer) म्हणून काम करतात. ते कॉपी राईट हक्काचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदा व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे कारवाई करतात. फिर्यादी यांना पिंपरी येथील साई चौकातील दोन दुकानामध्ये सुपरड्राय (Superdry)
या विदेशी ट्रेडमार्क कंपनीचे लेबल (Trademark company label) लावून बनावट
जिन्स पँट विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार फिर्यादी यांनी पोलीस उपायुक्त (DCP) परिमंडळ 1 यांच्याकडे तक्रार अर्ज
करुन कारवाई करण्याची परवानगी मागितली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलीस उपायुक्तांनी कारवाईला मंजूरी दिल्यानंतर रविवारी पिंपरी पोलीस ठाण्यातील पथकाने आणि फिर्यादी यांनी पंचासमक्ष दोन्ही दुकानात छापा टाकला. त्यावेळी जीन्स पाईंट बाय लेजेंड्स चॉईस या दुकानातून 15 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 312 बनावट जिन्स पँट जप्त केल्या.
त्यानंतर लेजेंड्स चॉईस मेन्स वेअर या दुकानातून 10 लाख रुपये किमतीच्या 200 जिन्स पँट जप्त करुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Sale of fake jeans in the name of a reputed company in Pune, seizure of goods worth Rs 25 lakh

हे देखील वाचा :

Pune Crime | इंटिरीअर डिझाईनर महिलेने डिस्काऊंटचे आमिष दाखवून केली 7 लाखांची फसवणूक; विचारणा केल्यावर दिली आत्महत्येची धमकी

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच ! आठवड्याची सुरुवातही भाववाढीने, जाणून घ्या नवीन दर

Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात कधी ऊन तर, कधी पाऊस ! आता गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट दर

Related Posts