IMPIMP

Pune Crime | संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात भाविकांचे दागिने चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड; 12 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Sant Tukaram Maharaj and Sant Dnyaneshwar Maharaj gang who stole jewelery from devotees during palkhi ceremony busted by crime branch 12 lakhs seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचे दागिने चोरणाऱ्या (jewelry Thieves) टोळीला गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Pune Crime Branch Unit 6) पथकाने अटक (Arrest) केली आहे. आरोपींकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या व्यक्तीला देखील पोलिसांनी (Pune Crime) अटक केली आहे. आरोपींनी पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात केलेले जबरी चोरीचे 18 गुन्हे उघडकीस आणून 12 लाख 24 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शंकर शिवाजी पवार Shankar Shivaji Pawar (वय – 23), महेंद्र सुरेश अरगडे Mahendra Suresh Argade (वय – 26), नितीन छगन काकडे Nitin Chhagan Kakade (वय – 22 सर्व रा. पाथर्डी, अहमदनगर), यांनी देहू (Dehu), आळंदी (Alandi) व पुणे परिसरात पालखी सोहळ्याच्या मार्गावर गर्दीचा फायदा घेत भाविकांचे दागिने चोरले. तर चोरीचे दागिने घेणाऱ्या प्रशांत छगन टाक Prashant Chagan Tak (वय – 26 रा. पाथर्डी, अहमदनगर) याला अटक करुन त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. (Pune Crime)

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्या पुण्यातून पंढरपुरकडे (Pandharpur) जात असताना पालखी मार्गावर तसेच विसावा ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारे शंकर पवार व महेंद्र अरगडे हे आळंदी-पुणे रोडवर थांबल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशी मध्ये आरोपींनी आळंदी, देहु व पुणे परिसरात भाविकांचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरीचे दागिने प्रशांत टाक याला विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी प्रशांत टाक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 12 लाख 24 हजार रुपये किमतीचे 24 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. तसेच आरोपींचे 1 लाख 30 हजार रुपये किमतीचे दोन महागडे मोबाइल जप्त केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात 16 जबरी चोरीचे व 2 चैन चोरीचे असे एकूण 18 गुन्हे उघडकीस आले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Senior Police Inspector Ganesh Mane),
पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके (PSI Bhairavnath Shelke),
पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे,
ऋषिकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांनी केली.

 

Web Title : – Pune Crime | Sant Tukaram Maharaj and Sant Dnyaneshwar Maharaj gang who stole jewelery from devotees during palkhi ceremony busted by crime branch 12 lakhs seized

हे देखील वाचा :

Ayurvedic Remedies for stomach worms | पोटातील जंत झाल्याने त्रस्त आहात का, ट्राय करा हे आयुर्वेदिक उपाय

Pune Crime | पुण्यातील कर्वेनगर परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

Home Remedies for Chest Gas | छातीतून गॅस काढण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय, मिळेल आराम

Related Posts