IMPIMP

Pune Crime | दिवसाढवळ्या शिवसेना तालुका उपप्रमुखाची पैशांची बॅग पळवली; परिसरात खळबळ

by nagesh
Pune Crime | bottle liquor smashed head stopped drinking alcohol

पुणे / शिक्रापूर : सरकारसत्ता ऑनलाइन   – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) शिक्रापूर येथील शिवसेना तालुका उपप्रमुखाची (Shivsena taluka deputy chief) पैशांची बॅग दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी चोरुन (money bag snatched) नेली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गर्दीच्या चौकातून हातातील पैशांची बॅग हिसका मारून चोरुन नेली. बॅगेमध्ये तीन लाख रुपये होते. या घटनेमुळे (Pune Crime) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) दोन अज्ञांत युवकांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला (Pune Crime) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

शिरुर तालुक्यातील पारोडी येथील हॉटेल व्यावसायिक तसेच शिवसेना शिरुर तालुका उपप्रमुख रोहिदास शिवले (Rohidas Shivale) हे शिक्रापूर येथील पाबळ चौकातील (Pabal Chowk) अ‍ॅक्सिस बँकेत (Axis Bank) पैसे काढण्यासाठी मुलासोबत आले होते.
त्यांनी बँकेतून पाच लाख रुपये काढले. त्यानंतर त्यांनी दोन लाख रुपये मुलाला दिले.
उर्वरित तीन लाख पिशवीत ठेवून दुचाकीवरुन जात होते.

त्यावेळी अचानकपणे दोन युवक रुमाल बांधून दुचाकीवरुन आले.
त्यांनी शिवले यांच्या हातातील पैशांची पिशवी घेऊन भरधाव वेगात चाकण चौकाच्या (Chakan Chowk) दिशेने पळून गेले.
या घटनेची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. (Pune Crime )

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याप्रकरणी रोहिदास बाजीराव शिवले (वय-52 रा. शिवतक्रार म्हाळुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे (API Ranjit Pthare) व पोलीस शिपाई अविनाश पठारे (Avinash Pthare) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Shiv Sena taluka deputy chief’s money bag snatched in broad daylight; Excitement in the area

हे देखील वाचा :

Reality TV Show | ‘या’ ठिकाणी 21 रात्र नग्नावस्थेत जंगलात रहावं लागतं जोडप्याला, तुम्हाला माहितीय का विचित्र रिअ‍ॅलिटी शो?

Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’

Pune Crime | लग्न समारंभात अडथळा आणण्याची धमकी देऊन लोकांना लुबाडणार्‍या पीपीएल कंपनीवर खंडणीचा गुन्हा दाखल

Related Posts