IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन दोघा नराधमानी केला बलात्कार, चिंचवडमधील घटना

by nagesh
Pune Crime | Shocking! A 12-year-old girl was abducted and raped by two men in Pimpri Chinchwad of Pune 

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | घरी जात असताना वाटेतून १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर दोघांनी बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) दोघांना अटक केली आहे. लक्ष्मण संजय क्षीरसागर Laxman Sanjay Kshirsagar (वय १८, मोरया सोसायटी,वेताळनगर, चिंचवड) आणि रोहीत रमेश सुतार Rohit Ramesh Sutar (वय २१, रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या प्रकरणी पिडित मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०२/२२) दिली आहे. हा प्रकार तुकारामनगरमधील रोहीत सुतारच्या घरी २१ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता घडला होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्षीरसागर हा वेल्डींगचे काम करतो तर, रोहीत सुतार हा रिक्षाचालक आहे. फिर्यादी यांची १२ वर्षाची मुलगी नातेवाईकांच्या घरी पिठाचा डबा देऊन पुन्हा घरी येत होती. त्याच परिसरात लक्ष्मण क्षीरसागर याने फिर्यादी यांच्या मुलीला उचलून रिक्षाचालक सुतार याच्या खोलीवर नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. मी तुझ्यासोबत जे केले आहे. ते कोणाला सांगितले तर मी तुला आणि तुझ्या घरच्यांना मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर सुतार हा देखील तेथे येऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर घाबरुन तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही पिडीत मुलगी राहते घराच्या परिसरातील आंब्याच्या झाडाचे आंबे ९ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता तोडत होती. यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी तिच्याशी गैरवर्तन करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केला. या प्रकाराची माहिती झाल्यावर २१ एप्रिल रोजी या दोघांनी केलेल्या कुकर्माची माहिती मुलीने आईला दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Web Title : Pune Crime | Shocking! A 12-year-old girl was abducted and raped by two men in Pimpri Chinchwad of Pune 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार बनले मालामाल; एका महिन्यात दुप्पट पैसे, जाणून घ्या

Pune Crime | पुणे महापालिकेच्या टॅक्सची बनावट पावती देऊन साडेतीन लाखांची फसवणूक; महिलेसह दोघांविरूध्द कोंढव्यात गुन्हा

Gold Silver Price Today | आजचे सोने आणि चांदीचे दर काय ?; जाणून घ्या

Maharashtra Co-operation Department | सहकार विभागाचा मोठा निर्णय ! सोसायटीची नोंदणी करतानाच कन्व्हेयन्सची पुर्तता

Related Posts