IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये आलेल्या 43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या, प्रचंड खळबळ

by nagesh
Nanded Crime | nanaded student suicide of 10 year old student of tribal ashram school in nanded crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये (Military Intelligence Training School) आलेल्या लष्करातील एका लेफ्टनंट कर्नल महिलेने (Lieutenant Colonel rank lady officer)
गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली (Pune Crime) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (wanwadi police station) गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुल हे महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय कॉलेज आहे. या संस्थेची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली आहे. येथील संस्थेत 9 वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी लेफ्टनंट कर्नल महिला आली होती. 43 वर्षाच्या या महिला लष्करी अधिकार्‍यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे केले हे अद्याप समोर आले नाही. त्या ठिकाणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तसेच वानवडी पोलिसांनी (Pune Crime) भेट दिली आहे.

हा प्रकार लष्करातील अधिकार्‍यांसंबंधी असल्याने याबाबत अधिकृतपणे पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, एका लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या महिला अधिकार्‍यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे यामुळे लष्करामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिलेने कैटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पण याबाबत सखोल तपास केला जात आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्या गुन्हा (Pune Crime) दाखल केला जात आहे.
मात्र, त्याची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
या प्रकरणी लष्कराच्या PRO शी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत लवकरच सविस्तर माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Web Title : Pune Crime | Suicide of Lieutenant Colonel rank lady officer in Military Intelligence Training School in pune

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक; पोलिसांनी 12 तासात मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

Pune Crime | पुण्यात डोक्यात दगड घालून तरुणाचा खुन !

High Court | हॉटेलच्या खोलीत लग्न, जोडप्याने भांड्यात आग पेटवून केली ’सप्तपदी’; हाकोर्टने म्हटले – ‘विवाह मान्य नाही, 25000 दंड’

Car Buying Guide | नवीन गाडी खरेदी करत आहात का? ‘या’ 5 पॉईंटचा आवश्य विचार करा, अन्यथा घेतल्यानंतर करावा लागेल पश्चाताप!

Related Posts