IMPIMP

Pune Crime | पुण्यात सुसाईड नोट लिहून माय-लेकीची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | young man committed suicide by hanging himself after getting fed up with money laundering in indapur of pune district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | आईला असलेल्या दुर्धर आजारामुळे तिचे हाल पाहवत नसल्याचे चिठ्ठीत लिहून माय-लेकींनी गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Suicide in Pune) धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना हवेली पोलीस ठाण्याच्या (Haveli Police Station) हद्दीतील किरकटवाडी (Kirkatwadi) येथे मध्य रात्री दोनच्या सुमारास उघडकीस आल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली आहे. संगिता दत्तात्रय खपाले Sangita Dattatraya Khapale (वय-48) आणि मुलगी (Daughter) रेखा दत्तात्रय खपाले Rekha Dattatraya Khapale (वय-28) असे आत्महत्या करणाऱ्या माय-लेकींची नावे आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी रेखा खपाले यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलीस अधिकारी बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संगिता, रेखा आणि त्यांचा मुलगा हे सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) किरकटवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. रेखा ही मजुरी करते. तर आई संगिता यांना मागील काही वर्षांपासून दुर्धर आजाराने ग्रासले आहे. घरातील परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून ती खडकवासला (Khadakwasla) येथे राहण्यास आहे. आई आजारी असल्याने ती घरीच असायची. (Pune Crime)

आईची ही अवस्था पाहवत नसल्याने रेखा आणि संगिता यांनी घरातील किचनमध्ये रात्री साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
रात्री दोनच्या सुमारास मुलगा पाणी पिण्यासाठी उठला असता त्याला किचनमधील लाईट सुरु असल्याचे दिसले.
त्याने किचनमध्ये जाऊन पाहिले असता आई आणि बहिणीने गळफास घेतल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
रेखा खपाले हिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
यामध्ये तिने आजारपणामुळे होणारे आईचे हाल आता पाहवत नाहीत…आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये, पोलिसांनी घरच्यांना त्रास देऊ नये असे चिठ्ठीत लिहले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिते (PSI Mohite) करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :  Pune Crime | Suicide of Mother and Daughter in Kirkatwadi area of Sinhagad Road Pune Police Got Suicide Note

हे देखील वाचा :

Rohit Pawar | अभिनेता किरण माने यांना रोहित पवारांचा पाठिंबा; जाणून घ्या नेमकी मानेंनी कोणती घेतलीय भुमिका

Sanjay Raut | सज्जन, निरागस, निष्पाप ! संजय राऊतांचा सल्ला; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांनी उगाच इकडे तिकडे न तडमडता…’

ESIC Recruitment 2022 | 10 वी पास असो किंवा ग्रॅज्युएट, सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी ! 3800 पेक्षा पदांसाठी भरती

Related Posts