IMPIMP

Pune Crime | लग्नाअगोदर नववधु पळाली ! वरपित्याची पोलीस ठाण्यात धाव; फसवणूक करुन बदनामी केल्याचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | FIR in Hadapsar Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | त्यांनी लग्न ठरविले, दोन महिन्यांपूर्वी सुपारीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर १ मे रोजी लग्नही ठरविले. लग्नाची (Marriage) त्यांनी धुमधडाक्यात तयारी केली. मात्र, लग्नापूर्वी नववधु (Bride Run Away Before Marriage) कोणाला न सांगता पळून गेली. त्यामुळे सर्व पाहुण्यांमध्ये बदनामी (Defamation) झाली. लग्नासाठी १ लाख ६२ हजार रुपयांचा खर्च करायला लावून फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) नववधुसह तिचे आईवडिल, भाऊ अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत दिघी (Dighi) येथील ६३ वर्षाच्या वरपित्याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६३/२२) दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील एका तरुणीचे फिर्यादी यांच्या मुलाशी विवाह ठरविण्यात आला होता. लग्नाची सर्व बोलणी करुन २७ मार्च रोजी सुपारीचा कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर नववधुच्या सहमतीने १ मे रोजी विवाहाची तारीख ठरविण्यात आली. फिर्यादी यांनी लग्नासाठी बस्ता बांधण्यासाठी ८० हजार, लग्नपत्रिकेसाठी ७ हजार, लग्न जमविणे, लग्न विधीचे कार्यक्रमासाठी ७५ हजार रुपये असा १ लाख ६२ हजार रुपयांचा खर्च केला. १ मे रोजी विवाहासाठी ते सर्व तयार असताना नववधु ही कोणाबरोबर तरी पळून गेली. त्यामुळे सर्व पाहुण्यांमध्ये बदनामी झाली. तसेच लग्नाचा खर्च करायला लावून फसवणूक (Cheating Case) केली. ऐन लग्नाच्या वेळी बदनामी झाल्याने वरपित्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कोल्लुरे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The bride ran away before the wedding Groom Father rushed to police station Filed a defamation suit

हे देखील वाचा :

Pune Crime | सहकारी तरुणीशी बोलतो म्हणून तरुणाच्या डोक्यात घातला दगड; वानवडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Lifestyle After 40 | वयाच्या चाळिशीनंतर करा राहणीमानात ‘हे’ 5 बदल, जाणून घ्या

Pune Crime | जंगली महाराज रस्त्यावर मोटारचालकाला लुटले

Related Posts