IMPIMP

Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड ! एअरगन पिस्टल, कोयता जप्त

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | रस्त्याने येणाऱ्या-जणाऱ्यांना दरोडा (Robbery) टाकून लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या 5 जणांच्या टोळीला (Pune Criminals Gang) गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने सापळा रचून अटक (Arrest) केली. त्यांच्याकडून एक एअरगन पिस्टल (Airgun Pistol), कोयता यासह दरोड्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 65 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) आयपीसी 399, 402 महाराष्ट्र पोलीस अधिनियम (Maharashtra Police Act) कलम 37(1)(3) सह 135 गुन्हा (FIR) दाखल केला असून आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Crime) आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उमेश शिवाजी शिंदे Umesh Shivaji Shinde (वय-26 रा. सयाजी इस्टेट, पुणे), हितेश अजित आधवडे Hitesh Ajit Adhavade (वय-20 रा. आनंता हाईटस, धायरीगाव, पुणे), अदित्य ज्ञानदेव शिंदे Aditya Dnyandev Shinde (वय-20 रा. धायरीगाव, रायकर मळा, पुणे), भगवान बाबासाहेब रोकडे Bhagwan Babasaheb Rokade (वय-23 रा. धायरीगाव, पुणे), भिमशा सुरेश चव्हाण Bhimsha Suresh Chavan (वय-18 रा. आंबेगाव बु.) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेने ही कारवाई मंगळवारी (दि.26) कात्रज चौक (Katraj Chowk) ते नवले ब्रिजकडे (Navale Bridge) जाणाऱ्या रोडवरील दत्तनगर बस स्टॉपजवळ केली. (Pune Crime)

गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक भारती पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कात्रज चौक ते नवले ब्रिज दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लुटण्यासाठी चार ते पाच जण दत्तवाडी बस स्टॉप (Dattawadi Bus Stop) कडेला अंधारात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना (Pune Police) मिळाली. त्यानुसार पथकातील पोलिसांनी सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता एक एअरगन पिस्टल, एक लोखंडी कोयता, मिरची पावडर, एक अ‍ॅक्टिव्हा, दोन मोबाईल असा एकूण 65 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते (API Vishal Mohite), पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे (PSI Rajendra Patole),
पोलीस अंमलदार अस्लम पठाण, मोहसिन शेख, संजय जाधव, साधना ताम्हाणे, उत्तम तारु,
मितेश चोरमोले, निखिल जाधव, कादिर शेख, नागनाथ राख यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | The gang of pune criminals, who were preparing for the robbery, arrested by pune police crime branch

हे देखील वाचा :

Girish Mahajan on Sanjay Raut | “सोंगाड्या चित्रपट निघाला असता तर, ती भूमिका संजय राऊतांना मिळाली असती”

Sanjay Raut On Underworld | संजय राऊतांनी सांगितलं, हनुमान चालिसा, भोंगे प्रकरणांशी अंडरवर्ल्डचं कनेक्शन; म्हणाले…

Anti Corruption Bureau (ACB) Satara | बिअर शॉपीच्या परवान्यासाठी 3 लाखाच्या लाचेची मागणी, उत्पादन शुल्कचे तीन अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts