IMPIMP

Pune Crime | सराईत गुंडाने तरुणाच्या डोक्यात रॉड मारुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | baramati youth knife attack on girl in her office Baramati City Police Station on the spot

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | भांडणात मध्ये पडल्याने एका तरुणाला खूपच महागात पडले आहे. एका सराईत गुंडाने या तरुणाच्या
डोक्यात लोखंडी रॉड काढून लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police Station) सुरज दिगंबर शेजवळ Suraj Digamber Shejwal (वय २७, रा. निसर्ग अपार्टमेंट, आंबेगाव खुर्द) या सराईत गुंन्हेगाराला अटक केली आहे. त्याचा साथीदार किरण मोरे याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी मानव सुधीर कर्पे (वय २४, रा. बालाजीनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मानव कर्पे यांनी एका भांडणात मध्यस्थी केली होती. १२ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता ते कात्रजमधील मस्तान हॉटेलसमोरुन जात असताना किरण मोरे व सुरज शेजवळ यांनी त्यांना आडवले. तू आमच्या भांडणात का आला. आज तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून किरण मोरे याने लोखंडी रॉड काढून फिर्यादीच्या डोक्यात मारुन रक्तबंबाळ (Pune Crime) केले. सुरज शेजवळ याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खाली पाडून जोरात गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | The goon tried to kill the young man by hitting him on the head with a rod; Bharati Vidyapeeth Police Station Case

हे देखील वाचा :

Sambhaji Patil Nilangekar | संभाजी पाटील निलंगेकरांचा पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर गंभीर आरोप

Karuna Munde | ‘मला अजूनही न्याय मिळाला नाही. पण मी समाधानी’ ! करूणा मुंडे म्हणाल्या – ‘धनंजय मुंडे स्वत:हून मला…’

Coronavirus | कोरोना विषाणूवरील प्रभावी 2 नव्या औषधांच्या वापराला WHO ची मंजूरी

Sugar Patients Diet | ’शुगर फ्री’ आहेत ‘ही’ 5 फळे आणि भाज्या, तज्ज्ञांनी डायबिटीज रूग्णांना दिला खाण्याचा सल्ला

MNS | मराठी पाट्यांबाबत मनसेचा व्यापाऱ्यांना इशारा; जाणून घ्या मनसेची भूमिका

Related Posts