IMPIMP

Pune Crime | पत्नीला नांदविण्यासाठी आणायला गेलेल्या पतीला मेव्हण्यांनी केली बेदम मारहाण; खडकीतील अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी परिसरातील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime | A tempo transporting animals for slaughter was caught in Pimpri Chinchwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पत्नीने सासरी नांदायला यावे, यासाठी तिला आणायला गेलेल्या पतीला पत्नीचे भाऊ, दाजी व इतर नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत पतीचे पुढील दोन दात अर्धे पाडून जखमी केले गेले. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी सुमित विनोद मोरे (वय २६, रा. सुपर एक्स क्वार्टस, अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी परिसर, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुमित मोरे याची पत्नी मेघा, विनायक संजय शिंदे, गौरव शर्मा, रुपा शिंदे, काजल शिंदे, कोमल शिंदे (रा. अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी परिसर, खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पत्नीने नांदण्यास यावे, यासाठी तिच्या माहेरी गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाल्याचे पाहून तिचे भाऊ, दाजी यांनी एकत्र येऊन फिर्यादीला मारहाण केली.
विनायक शिंदे याने बॅटने व गौरव शर्मा याने पाईपने फिर्यादीच्या हातावर, पायावर, पाठीवर मारहाण केली.
बुक्कीने दातावर, ओठावर मारहाण केली.
त्यात फिर्यादीचे पुढील दोन दात अर्धे पडले असून त्याच्या पत्नीने हाताने मारहाण करुन जखमी केले,
म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | The husband who had gone to fetch his wife was beaten to death by his mother in law Incidents at the Ammunition Factory premises in Khadki

हे देखील वाचा :

Russian President Vladimir Putin | रशियाने युक्रेनवर केला लष्करी हल्ला; पुतीन यांची युद्धाची घोषणा, चार शहरावर मिसाईल हल्ले

Pune Police | पुण्यातील वजनदार पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन ! अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याचा ठपका

Pune Police | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांचा ‘रूद्रावतार’ ! आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकास केलं कंट्रोलशी संलग्न; अनेकांचे धाबे दणाणले, ‘सेक्शन’ गरम

Related Posts