IMPIMP

Pune Crime | फटाका स्टॉलवरुन फटाके घेऊन जाऊन जीवे मारण्याची दिली धमकी; सराईत गुन्हेगारासह टोळक्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | a lemon sorbet seller was robbed at gunpoint during the day Pune Crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Crime | फटाका स्टॉलवर येऊन २७ हजार रुपयांचे फटाके घेऊन पैसे न देता माझ्या हद्दीत हप्ता द्यायचा नसेल तर फटाके घेऊन जाणार कोणाला सांगायचे ते सांग पोलीस येईपर्यंत तुझा मर्डर करुन निघुन जाईल, अशी धमकी (Threat) दिली. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी आनंद प्रभाकर भारती Anand Prabhakar Bharti (वय ३८, रा. सार्थक हाईटस, आंबेगाव बु़) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सचिन ऊर्फ टिंक्या शेलार Sachin alias Tinkya Shelar (रा. वानवडी) व त्याच्या इतर ३ साथीदारांवर खंडणीचा (Ransom) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबतची माहिती अशी, आनंद भारती यांचा वानवडी येथील काकडे मैदानात आनंद फटाका मार्ट हे दुकान आहे.
स्टॉलवर राम कांबळे (Ram Kamble) हा कामगार व ते उपस्थित असताना २४ ऑक्टोबरला रात्री साडेनऊ वाजता
सचिन शेलार व त्याचे ३ साथीदार आले. त्यांनी वेगवेगळ्या किंतीचे २७ हजार रुपयांचे फटाके काढले.
फिर्यादी यांनी पैशाबाबत विचारणा केली असता त्याने कोयत्याचा धाक दाखवत माझ्या एरियात धंदा करतोय तर मला हप्ता द्यायचा. नसेल द्यायचा तर फटाके घेऊन जाणार कोणाला सांगायचे ते सांग.
पोलीस येईपर्यंत मी तुझा मर्डर करुन निघुन जाईल, असे बोलून जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या
कामगाराला चापट मारुन फटाके घेऊन हातातील कोयता नाचवत ‘‘भाई को याद रखो तडीपार आहे.
मी कोणी आडवा आला तर तोडून टाकील,’’ असे बोलून दहशत निर्माण करीत ते निघून गेले.
सहायक पोलीस निरीक्षक जाधव (Assistant Police Inspector Jadhav) तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | Threatened to take firecrackers from a firecracker stall; A case of extortion has been registered against a gang including a Sarai criminal

हे देखील वाचा :

Pune Crime | पत्नीचा गळा आवळून केला खून, लोहगावमधील घटना

T20 World Cup | पाकिस्तानचे भवितव्य आता भारताच्या हातात, नेमके काय आहे वर्ल्डकपचे समीकरण

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करुन घातला साडेतीन लाखांना गंडा

Related Posts