IMPIMP

Pune Crime | शिवाजीनगर पोलीस लाईनसमोर तीन तरुणांवर धारदार हत्याराने सपासप वार, 18 ते 20 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Duttawadi Police Station - Gang tried to kill youths by stabbing them as friends ran away

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | किरकोळ वादातून 18 ते 20 जणांच्या टोळक्याने तीन तरुणांवर पालगन, कोयत्याने सपासप वार केल्याची घटना शिवाजीनगर येथील पोलीस वसाहती समोर (Shivajinagar Police Colony) घडली आहे. या घटनेत हर्षद शांताराम शेटे (Harshad Shantaram Shete), विशाल शेटे (Vishal Shete) व त्यांचा मित्र संकल्प मोरे (Sankalp More) गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी (Pune Police) आरोपींविरुद्ध आयपीसी 326, 324, 143, 144, 145, 147, 148, 149, आर्म अ‍ॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act) 37/1,135 अन्वये गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत हर्षद शांताराम शेटे (वय – 21 रा. शिवाजीनगर पोलीस लाईन, मॉर्डन कॉलेज (Modern College) समोर, शिवाजीनगर) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अनोळखी 25 ते 30 वयोगटातील 18 ते 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना सोमवारी (दि.9) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रोडवरील (Jangli Maharaj Road) झाशीची राणी चौकात हर्षद, विशाल आणि संकल्प यांची दुचाकीवरील दोघांसोबत रविवारी (दि.8) रात्री साडेदहाच्या सुमारास वादवादी झाली होती.
याच वादाचा राग मनातधरुन सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास 18 ते 20 जण शिवाजीनगर पोलीस वसाहत समोरील रस्त्यावर आले.
त्यांनी परिसरात दहशत माजवत हर्षद आणि विशाल या भावंडासह त्यांचा मित्र संकल्प याच्यावर वार करुन गंभीर जखमी केले.
त्यानंतर आरोपी पळून गेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नाईक (API Naik) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Three youths were stabbed in front of Shivajinagar police line 18 to 20 FIRs were registered against them

हे देखील वाचा :

Gold Price Today | दोन महिन्यात सोन्याच्या दरात 5000 रुपयांची घसरण, 47,161 रूपयात मिळतंय 10 ग्रॅम

Pune MNS | आवाजाबाबत पुणे पोलिसांनी पत्रक काढले नाही तर… पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची भेट

EPFO Update | आता राहणार नाही पेन्शनचे टेन्शन, ईपीएफओने सुरू केला ‘हा’ नवीन उपक्रम

Related Posts