IMPIMP

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station - Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | किराणा दुकानासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapith Police) पतीसह तिघांवर गुन्हा
(FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत ओमप्रकाश दशरथ शाहु Omprakash Dashrath Shahu (वय ५५, रा. सप्तगिरीनगर, नागपूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapith Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती सुमित संजय मेढवाल Sumit Sanjay Medhwal (वय २४), सासु वंदना संजय मेढवाल Vandana Sanjay Medhwal (वय ४५, रा. समृद्धी रेसिडेन्सी, आंबेगाव पठार) आणि नणंद कोमल विक्रम बारीया Komal Vikram Baria (रा. मोहम्मदवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तरुणा सुमित मेढवाल (Taruna Sumit Medhwal) असे आत्महत्या (Suicide In Pune) केलेल्या विवाहितेचे नाव आहे. छळाचा हा प्रकार आंबेगाव पठार येथील घरी १० एप्रिल ते २२ सप्टेबर २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी तरुणा हिचा सुमित याच्याबरोबर १० एप्रिल २०२२ रोजी विवाह झाला होता.
लग्नानंतर सुमित हा विनाकरण शिवीगाळ करुन तरुणाला मारहाण (Beating) करीत असे.
किराणा दुकान सुरु करण्यासाठी वडिलांकडून ५ लाख रुपये घेऊन ये, या कारणसाठी तिला त्रास दिला जात होता.
या छळाला कंटाळून तिने २२ सप्टेबर रोजी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस उपनिरीक्षक शिंदे (Sub-Inspector of Police Shinde) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Tired of torture by in-laws, married woman commits suicide by hanging herself

हे देखील वाचा :

Supreme Court On Marital Rape Case | मोठी बातमी ! अविवाहित महिलांना सुद्धा MTP अ‍ॅक्ट अंतर्गत गर्भपाताचा अधिकार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Rain in Maharashtra | आज पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस, पुढील तीन दिवस राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता

Thane ACB Trap | विद्यार्थ्यांकडून लाच घेणाऱ्या तंत्रशिक्षण विभागातील मोठा अधिकारी, महिला प्राचार्यासह चारजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts