IMPIMP

Pune Crime | गणेश मूर्ती विक्री दुकानातून महिलेने केले 50 हजार रुपये लंपास

by nagesh
 Pune Crime | in pune a husband pushed his wife from the fourth floor if you read the reason you will be annoyed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | गणपती मूर्ती (Ganesha idol) विक्री करणाऱ्या दुकानातून नजर चुकवून 50 हजारांची रोकड लांबविल्याची (woman stole rs 50000) घटना पुण्यातील (Pune Crime) येरवडा भागात घडली आहे. याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. तर तिच्यासोबत असलेल्या दोन महिलांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रंजना सुरेश साळुंखे (वय-60 रा. सांगोला जि. सोलापूर)  अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एका 33 वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार महिलेचा गणेश मूर्ती विक्री व्यवसाय आहे. येरवडा गाडीतळ परिसरात महिलेने गणेश मूर्ती विक्रीचा स्टॉल (Ganesh idol sale stall) टाकला होता. शुक्रवारी (दि.10) दुपारी साडेतीनच्या सुमारास मूर्ती खरेदी करण्याच्या बहाण्याने तीन महिला त्यांच्या स्टॉलमध्ये आल्या. रंजना साळुखे आणि तिच्या सोबत असलेल्या महिलांनी गणेश मूर्ती विकत घेण्याच्या बहाण्याने तक्रारदार महिलेला बोलण्यात गुंतवले. तक्रारदार महिला दोन महिलांसोबत बोलत असताना दिवसभरात जमा झालेली स्टॉलवरील 50 हजारांची रोख रक्कम चोरली.

रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर मूर्ती विक्रेत्या महिलेने त्वरीत पोलिसांकडे तक्रार दिली.
पोलिसांनी तातडीने तपास करून एका महिलेला पकडले असून तिच्या बरोबर असलेल्या दोन महिलांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वारंगुळे (PSI Ravindra Warangule) तपास करत आहेत.

Web Title : Pune Crime | woman stolen 50 thousand from ganesha idol shop

हे देखील वाचा :

Health Tips | धमण्यांमध्ये तयार होणारे प्लाक हृदय आणि मेंदूसाठी धोकादायक, ते टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स; जाणून घ्या

Gujrat New CM | गुजरातचा नवीन मुख्यमंत्री कोण ? चर्चेला पूर्ण विराम, भूपेंद्र रजनीकांत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Earn Money | कमाईची गोष्ट ! 2 लाख रुपये गुंतवून ‘या’ कंपनी सोबत सुरू करा बिझनेस, दरमहा होईल 5 लाखांची कमाई, जाणून घ्या

Related Posts