IMPIMP

Pune Crime | तरुणीकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, विवाहित तरुणाची आत्महत्या; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

by nagesh
Nanded Crime | nanaded student suicide of 10 year old student of tribal ashram school in nanded crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | लग्नानंतरही एका तरुणीबरोबर अनैतिक संबंध (Immoral Relations) ठेवले. घरातील विरोधानंतर त्याने तिच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने संबंध तोडले तर बलात्काराचा (Rape) गुन्हा (FIR) दाखल करुन सर्वांना जेलमध्ये (Pune Crime) टाकीन, अशी धमकी (Threat) दिली. या धमकीमुळे एका विवाहित तरुणाने घरी साडीने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Committed suicide) केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अमीर शकूर काझी Amir Shakur Kazi (वय – 30, रा. कसबा, बारामती) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) एका तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. याप्रकरणी अमीर काझी याच्या पत्नीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर काझी याला दोन मुली असून तो दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता.
त्याचे एक वर्षांपासून एका तरुणीबरोबर अनैतिक संबंध होते.
अमीर हा तिच्या घरी जात होता. याला त्याच्या घरातून विरोध होता. त्यामुळे त्याच्या आईने त्याला वेगळे रहायला सांगितले होते.
गेल्या काही दिवसांपासून तो तिच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न करीत होता.
त्यामुळे तो तणावात होता.
पत्नीने त्याला विचारले असता “तू माझ्याशी संबंध तोडले तर मी तुझ्यावर व तुझ्या घरच्यांच्या विरुद्ध पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल करील व तुला व तुझ्या घरच्यांना जेलमध्ये टाकीन.
तुमच्या घरच्यांच्या सर्वांच्या नावची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेल,” अशी वारंवार धमकी देत असल्याचे त्याने पत्नीला सांगितले.
त्यामुळे तिने मला फोन करुन बोलाविल्यानंतर मला जावे लागते, असे त्याने सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

19 मे रोजी अमीर मोबाईलवर मोठमोठ्याने बोलत घरी आला.
त्याने खोलीला आतून कडी लावून घरातील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अंत्यविधी पार पडल्यानंतर आता पोलिसाकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी त्या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Young woman threatens to file rape case married youth commits suicide Shocking incident in baramati of Pune district

हे देखील वाचा :

Maharashtra Police Crime News | धक्कादायक ! पोलिसानेच केला सहकारी महिलेवर बलात्कार, पोलीस दलात खळबळ

High Court Order On Corona Mask Rules | ‘विमानात मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’ – उच्च न्यायालयाचे आदेश

सावधान ! WhatsApp वर ‘या’ नंबरवरून आला असेल मेसेज तर चुकूनही करू नका Reply, होऊ शकता कंगाल

Related Posts