IMPIMP

Pune Cyber Crime | पुण्यात महिला बँक कर्मचार्‍यालाच सायबर चोरट्यांनी घातला गंडा ! 4 हजारांसाठी गमावले 64 हजार

by nagesh
Pune Cyber Crime | Cyber thieves duped a female bank employee in Pune! 64 thousand lost for 4 thousand

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Cyber Crime | आपल्या बँक खात्याची, गोपनीय नंबर कोणाला सांगू नका, असे बँका आणि पोलिसांकडून सातत्याने सांगितले जाते. असे असले तरी ते लोकांच्या गळी उतरेलच असे नाही. बँकेत काम करणारी एक महिला कर्मचारी बँकांकडून ग्राहकांना सांगणार्‍या खबरदारी स्वत: मात्र विसरली आणि सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) तिचे बँक खाते रिकामे करीत गंडा घातला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार गणेशखिंड रोडवरील (Ganesh Khind Road) अ‍ॅक्सीस बँकेत (Axis Bank) २५ ऑक्टोबर रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अ‍ॅक्सीस बँकेत नोकरी करतात. त्यांनी २०२१ मध्ये नोकरी डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन करुन त्यांची पेड सर्व्हिस घेतली होती. त्याचे त्यांनी ४ हजार रुपये भरले होते. त्यांना २५ ऑक्टोबर रोजी एका फोन आला. चोरट्याने त्यांना आपण नोकरी डॉट कॉमवरुन बोलत असल्याचे सांगितले. तुमचे पैसे रिटर्न करण्यात येत आहेत, असे सांगून त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठविली. फिर्यादी यांना डेबीट कार्डची (Debit Card) माहिती भरण्यास सांगितल़े. आपली माहिती कोणाला देऊ नये, हा संदेश त्या ४ हजार रुपये मिळणार, या विचारात विसरुन गेल्या. त्यांनी माहिती भरुन पाठविली. त्याबरोबर त्यांच्या अ‍ॅक्सीस बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी ६४ हजार ६०० रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे. त्यांनी पोलिसांकडे (Pune Cyber Crime) तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Cyber Crime | Cyber thieves duped a female bank employee in Pune! 64 thousand lost for 4 thousand

हे देखील वाचा :

Zodiac-2022 | नववर्षात शनीदेवापासून ‘या’ राशींची सुटका होणार; जाणून घ्या

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

7th Pay Commission Updates | खुशखबर ! 32 लाख लोकांच्या अकाऊंटमध्ये 2 लाख रुपये टाकणार सरकार

Related Posts