Pune Cyber Crime News | 3,35,03,177 हा आकडा आहे पुणेकरांना एकाच दिवसात सायबर चोरट्यांनी घातलेल्या गंड्याचा

पुणे : Pune Cyber Crime News | स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करुन भरघोस नफा मिळवून देतो, तुमच्या आधार कार्डाचा नंबरवर मनी लाँड्रिंग केले गेले आहे. तुमचे अकाऊंटची तपासणी करायची आहे. ऑनलाईन टास्क जॉब देण्याचा बहाणा करुन सायबर चोरटे फसवत असतात. त्यात आर्थिक लोभापायी मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणावर फसविले जात आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३४ पोलीस ठाण्यात बुधवारी एकाच दिवशी ३ कोटी ३५ लाख ३ हजार १७७ रुपयांच्या फसवणूकीचे ९ गुन्हे दाखल झाले आहे. त्यातील जवळपास सर्व सायबर चोरट्यांनी ऑनलाईन फसवणुक केल्याचे दिसून येते. (Cheating Fraud Case)
रस्त्याने जाताना कोणी तुम्हाला चाकू दाखवून तुमच्या खिशातून २०० रुपये व मोबाईल चोरुन नेला तर पोलीस गुन्हा दाखल करतातच. त्यावेळी पोलीस निरीक्षक स्वत: घटनास्थळाला भेट देतो. दुसरीकडे तुम्हाला एक फोन येतो, तुमच्या नावाने पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळले. तुमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय, मुंबई पोलीस गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगून लाखो रुपयांना फसविले जाते. पण, हे गुन्हे महिनोंमहिने साधे दाखलही करुन घेतले जात नाही. अशी सध्या परिस्थिती दिसून येते. (Online Cheating)
इंडिया फायनान्स अॅथोरिटीकडून बोलत असल्याचे सांगून इंन्शुरन्स फंड जमा करण्याकरीता वेगवेगळी कारणे दाखवून एका ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांला २३ लाख ५३ हजार रुपयांना फसविण्यात आले. (Online Fraud)
शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन चांगला परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली एका तरुणाला ३४ लाख ६९ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याच्या नावाखाली सध्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्या जात आहे.
त्याचवेळी अगोदर वीज बिल भरले नसल्याचे सांगून तुमचा वीज पुरवठा खंडीत केला जाईल, अशी भिती दाखवून सायबर चोरटे फसवणूक करत होते. आता शहरी भागात ज्या ठिकाणी पाईप गॅस पुरविला गेला आहे. त्या ग्राहकांना सायबर चोरटे तुमचे गॅसचे बिल अपडेट करा, नाही तर गॅस पुरवठा खंडीत केला जाईल, असे सांगून फसवणूक करु लागले आहेत.
शहरात दररोज फसवणूकीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. परंतु, याबाबत जनजागृती खूप कमी पडते. याबाबत गुन्हे दाखल करण्यासच मुळात वेळ लागतो. त्याचा तपास करुन परराज्यातील गुन्हेगारापर्यंत पोलीस क्वचितच पोहचू शकतात. तेव्हा लोकांनीच आता काळजी घेण्याची गरज आहे.
Comments are closed.