IMPIMP

Pune Cyber Crime | बँक मॅनेजर महिलेला सायबर चोरट्यांनी घातला 10 लाखांना गंडा; महागड्या वस्तू कुरियरने पाठविल्याचा केला बहाणा

by nagesh
Pune Crime | State Bank was robbed of 19 lakhs by cyber thieves in the name of the director of the famous Sarafi Pedhi.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Cyber Crime | सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून भेट वस्तू पाठविल्याचे सांगून कस्टममध्ये (Custom) अडकल्याचा बहाणा करून तरुणींचा गंडा घालण्याच्या नायजेरियन फ्रॉड मध्ये (Nigerian Fraud) पुण्यातील एक महिला बँक मॅनेजर (Women Bank Manager) अडकली आणि 10 लाख गमावून बसली. याप्रकरणी सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) राहणार्‍या एका 33 वर्षाच्या महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (Pune Cyber Crime) दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 20 मार्च ते 25 एप्रिल 2022 दरम्यान घडला. फिर्यादी या बँक मॅनेजर आहेत.
त्यांची एरीक जॉन (Eric John) याच्याशी सोशल मीडियावर (Social Media) ओळख झाली होती.
त्यातून त्याने फिर्यादी यांना आयपॅड (iPad), सोन्याची चैन (Gold Chain), परफ्युम (Perfume), तसेच घड्याळ (Watch)
अशा महागड्या वस्तू कुरियरने पाठविल्याचे सांगितले. (Pune Cyber Crime)

त्या वस्तू दिल्ली एअरपोर्टवरील (Delhi Airport) कस्टम ऑफिस मध्ये अडकल्या आहेत.
एंटी मनी लॉन्ड्रिंग (Anti Money Laundering) व इन्शुरन्स प्रमाणपत्र (Insurance Certificate) चार्जेस भरावे लागतील,
असे सांगून त्यांना सुरुवातीला 2 लाख 85 हजार रुपये व त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून 6 लाख 85 हजार रुपये अशी एकूण 10 लाख 8 हजार रुपये भरायला भाग पाडले.
आपली फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाजन (Senior Police Inspector Mahajan) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Cyber Crime | pune cyber crime Bank manager woman of Rs 10 lakh by cyber thieves The excuse of sending expensive goods by courier

हे देखील वाचा :

Post Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ आहे जबरदस्त योजना ! दरमहा होईल चांगले उत्पन्न; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra MLC Election 2022 | विधान परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग ! शिवसेना-राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ; भाजप, काँग्रेसची अडचण, गणित कसं जुळणार?

Maharashtra MLC Election 2022 | राष्ट्रवादीची शिवसेनेवर कुरघोडी’; भाजप नेते प्रविण दरेकरांचा आरोप

Related Posts