IMPIMP

Pune Farmer Suicide | पुणे जिल्ह्यात शेतकर्‍याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये अजित पवारांना निवेदन दिल्याचा उल्लेख

by nagesh
Pune Crime | Fed up with harassment a married woman jumps off a terrace and commits suicide Incidents in Katraj area

पुणे / दौंड : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Farmer Suicide | राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप, नाट्य सुरू असताना दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांचे सत्र संपलेले नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात 35 लाखाचे कर्ज बँकेने नाकारल्याने एका शेतकर्‍याने आत्महत्या (Pune Farmer Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी या शेतकर्‍याने सुसाईड नोट लिहिली असून कारण समोर आले आहे.

मृत शेतकर्‍याचे नाव नानासो मच्छिंद्र शेळके आहे. आत्महत्येच्या घटनेनंतर शेळके यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने
कर्ज नाकारल्यानेच नानासो शेळके यांनी आत्महत्या केली. मृत शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात
आणि अधिकार्‍यांची नावे नमूद केली आहेत.

दूध व्यवसायावर 35 लाख रुपये कर्ज देण्याची मागणी नानासो शेळके यांनी केली होती, परंतु अडीच एकर क्षेत्र असल्याने बँकेने कर्ज नाकारले. यामुळे शेळके खुपच निराश होते. यानंतर त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

निवडणुकीत मदत केली, पण माझा केवळ वापर केला

मृत शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, माझ्याकडे जुने कर्ज होते. नवीन कर्ज देतो असे सांगितले. मी त्यांना निवडणुकीत मदत केली. माझा वापर त्यांनी फक्त मतदानासाठी केला.

माझी परिस्थिती नसतानाही त्यांनी कर्ज भरायला लावले. मी ते पैसे बाहेरून जमा केले. मला कर्ज प्रकरणाचे संपूर्ण पेपर जमा करण्यासाठी सांगितले. मी कर्ज पूर्ण भरल्यावर मला कर्ज देण्यास टाळाटाळ केली. मी थोरात यांच्याकडे विनंती केली त्यांनी होकार दिला आणि आमच्यासमोर फोनवर सांगितले.

सुसाईड नोटमध्ये अजित पवारांचाही उल्लेख

शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये पुढे म्हटले आहे की, नंतर अधिकारी सोसायटी सचिव यांनी गडदरे
साहेब, संदीप काळे यांनी माझा विश्वासघात केला. मी अजित पवार यांच्याकडे निवेदन दिले. पण,
त्यानंतरही अधिकार्‍यांनी मला उडवाउडवीची उत्तरे दिली. गावात इतर लोकांना कर्ज देण्यात आली.
मी, फक्त दूध व्यवसायासाठी कर्ज मागितले होते.

मला खूप त्रास सहन करावा लागला. माझी मानसिक स्थिती खूप बिघडली आहे व असा अन्याय कुणावरही करू नये. माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ नये. माझ्या मृत्यूनंतर जमीन माझ्या नातेवाईकांना द्यावी, असे शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

Web Title : Pune Farmer Suicide | bank refuses loan of rs 35 lakh frustrated farmer commits suicide at daund pune

हे देखील वाचा :

Nitin Gadkari | अनर्थ टळला ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या ताफ्यातील कारचा अपघात; एक जखमी

Justice D Y Chandrachud | सोशल मीडियावर खोट्याचा (फेक न्यूज) बोलबाला, ‘प्रेस’ची निष्पक्षता सुनिश्चित व्हावी – सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांना सीबीआयची क्लिन चिट? CBI च्या उपअधीक्षकांनाच वाटत नाही आरोपात तथ्य

Related Posts