Pune Lok Sabha Election 2024 | वसंत मोरे यांच्यासह 33 जणांचे डिपॉझिट जप्त; जाणून घ्या
पुणे: Pune Lok Sabha Election 2024 | राज्यातील प्रतिष्ठेचा पुणे लोकसभा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यात भाजपाला (BJP) यश मिळाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) वसंत मोरे (Vasant More) यांच्यात तिरंगी लढत झाली.
या निवडणुकीत भाजपाच्या मोहोळ यांनी बाजी मारली आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार मोहोळ यांनी धंगेकरांवर १,१८,८७८ मतांची विजयी आघाडी घेतली आहे. मोहोळ यांना ५,६२,५४४ रवींद्र धंगेकरांना ४,४३,६६६ मतं मिळाली. वंचितचे वसंत मोरे फारशी कमाल करु शकले नाहीत. त्यांना फक्त ३१,३४६ मतं पडली आहेत.
या मतदारसंघात धंगेकर वगळता इतर ३३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. लोकसभा उमेदवारांसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर करताना स्वतःची माहिती, मालमत्ता, विवरण पत्र , प्रतिज्ञापत्र व सोबत २५ हजार रुपये डिपॉझिट जमा करावे लागते. पुण्यातील ३३ उमेदवारांचे ८ लाख २५ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहे.
डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार
वसंत मोरे : ३१ हजार ९९१
प्रशांत रणपिसे : ३९६९
अनिस सुंडके : ८५९
मिलिंद कांबळे : ३४४
नीरज कामठाण : ३५१
मनोज वेताळ : ३५१
युवराज लिंबोळे : ६९८
विजयालक्ष्मी सिंदगी : २३९
सुब्रोतो रॉय : २९३
सुरेश पाटील : ४३७
हेमंत पाटील : ३७४
अश्विनी खैरनार : ४१२
मारुती आंबोरे : ४३३
संदीप चोरमोले : १६५५
गोरख घोडके : १४५१
किरण रायकर : १०५२
चंद्रकांत सावंत : ३१४
जॉन्सन कोल्हापुरे : ३०४
डॉ. देवयानी पंडित : ६४५
नरेंद्र पावटेकर : ५३३
रज्जाक बागवान : १४६
बाबा सय्यद : १६३
डॉ. बाळासाहेब पोळ : २५९
महेश म्हस्के : २२९
यबिस तुजारे : २२३
ऍड.योगेश मकाने : २९८
विजय जगताप : ३८२
सब्बीर तांबोळी : ३१३
सचिन धनकुडे : ७८८
सागर पोरे : ५१५
संजय केंडाळे : ३११
झोंशो विजय प्रकाश : १३८
Comments are closed.