IMPIMP

Pune Metro | मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील गणेश मंडळांनी दिला ‘हा’ इशारा

by nagesh
Pune Metro | Traffic changes in Yerawada area for Metro work

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यात मेट्रोची (Pune Metro) कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला लकडी पुलावरील मेट्रो पुलाचा (pune metro bridge) अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे पुण्यातील गणेश मंडळांनी (Ganesh Mandals) गणेशोत्सव काळात लकडी पुलावरील (lakdi pul) मेट्रोचे काम थांबवण्याची विनंती मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र मेट्रोच्या (Pune Metro) अधिकाऱ्यांनी मेट्रो पुलाला होणारा विरोध थांबवण्यास सांगून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना उद्धटपणे उत्तर दिले. याचा गणेश मंडळांनी निषेध करुन मेट्रोच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांनी केलेली विनंती मान्य करुन काम थांबवले.
मात्र, रात्रीच्या वेळी त्याठिकाणी क्रेन आणून पुन्हा काम सुरु केले.
मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी काम सुरु करुन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची दिशाभूल केली.
मेट्रोचे काम सुरू झाल्याचे समजताच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हे काम बंद पाडले.
तसेच हे काम थांबून जो पर्यंत तोडगा काढला नाही किंवा आम्हाला विश्वासात घेऊन चर्चा केली नाही तर आम्ही हा मेट्रो पूल होऊ देणार नाही.
पुढे काही घडलं तर मेट्रो प्रशासन (Metro Administration) जबाबदार असेल असा इशारा गणेश मंडळांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुण्यातील गणेश मंडळाचे पदाधीकारी पुण्याचे मेट्रोचे अधिकारी गाडगीळ यांना भेटण्यासाठी गेले असता गाडगीळ यांनी पुण्यातील गणेशोत्सव दोन वर्षे झालेला नाही.
तसेच तो यापुढे कमी प्रमाणात होणार आहे. त्यामुळे तुम्ही लकडी पुलावर होत असलेल्या मेट्रोच्या कामाला विरोध करु नका असे सांगितले.
याशिवाय आजपर्यत कोणत्याही अधिकाऱ्यांनी पुण्यातील गणेश मुर्तीची उंची मोजली नाही.
परंतु मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गणेश मुर्तींची उंची मोजून गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
असे अक्षय ढमाले (Akshay Dhamale) यांनी सांगितले.

दरम्यान पुण्यातील गणेश मंडळांच्या शिष्टमंडळाने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांची भेट घेऊन मेट्रोचे काम थांबवण्यासाठी निवेदन दिले.
शिष्टमंडळाच्या निवेदनाची दखल घेत महापौर मोहोळ यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित (Metro Chief Executive Officer Brijesh Dixit) यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढू. तोपर्यंत मेट्रो पुलाचे काम थांबवण्यात यावे, असे आदेश मेट्रो प्रशासनाला दिले आहेत.

महापौरांना निवेदन देताना संकेत मते, आनंद सागरे, परेश खांडके, तुषार रायकर, यज्ञेश मुंडलिक,
अक्षय ढमाले, प्रणय शिंदे, श्रीराज रासने, गोविंद वांजळे, गौरव नरे, अभिजित वाळके, निखिल मलानी,
चकोर सुबंध, गौरव इनामदार,श्री कामठे, रितिक कुदळे, ओमकार परदेशी उपस्थित होते.

Web Title : Pune Metro | Protesting the statement of Metro officials, Ganesh Mandals in Pune gave warning

हे देखील वाचा :

Pune Court | गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये नाचताना झालेल्या किरकोळ भांडणातून खून करणाऱ्याला जन्मठेप

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, 10 हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्त दराने मिळतंय, जाणून घ्या नवीन दर

Sharad Pawar | मनपा निवडणुका पुढे ढकलणे अयोग्य – शरद पवार

Related Posts