IMPIMP

Pune Metro | शरद पवार यांचा फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड मनपा मेट्रोने प्रवास

by nagesh
PM Modi Visit To Pune | bjp leader girish mahajan gives befitting reply to ncp chief sharad pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Metro | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (सोमवारी)
पिंपरीतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनला (Phugewadi Metro Station) भेट दिली आहे. यावेळी पवार यांनी फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
(Phugewadi To PCMC Metro Station) असा मेट्रोने प्रवासाचा आनंद लुटला आहे. सध्या पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू आहे. त्याचबरोबर पिंपरी
चिंचवडमध्ये तर मेट्रोच्या यशस्वी चाचण्या पार पडल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad Corporation) ही मेट्रो धावण्यास सज्ज असणार आहे. दरम्यान आज शरद पवार यांनी मेट्रोने प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. (Pune Metro)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोरोनाच्या महामारीत पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील मेट्रोचे काम बंद पडले होते. त्या कामाला गती केव्हा मिळणार याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष होते. दरम्यान, मधील काळात पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या 6 किलोमीटर प्राधान्य मार्गावर मेट्रोची चाचणी यशस्वी झाली होती. त्यामुळे आता ती मेट्रो प्रवाशांसाठी सज्ज असणार आहे. यातच आज शरद पवार यांनी फुगेवाडी स्टेशनला भेट दिली तेव्हा त्यांनीही मेट्रोतून प्रवास केला आहे. (Pune Metro)

दरम्यान, पुणे महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गाचे 90 टक्के काम गतवर्षी पूर्ण झाले होते. 2022 च्या जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीत पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गावर मेट्रो धावणार होती. पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गावर महामट्रो (Maha Metro) सुरूवातीला रोज पद्धतीने चालवली जाणार असल्याचे त्यावेळी म्हटले होते. तर, पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय ते फुगेवाडी या मार्गावर एकूण 5 स्टेशनचा समावेश आहे. लवकरच नागरिकांना या मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

Web Title : Pune Metro | sharad pawar pune metro journey phugewadi metro station to PCMC metro station pimpri chinchwad municipal corporation

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या- चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

Professor N D Patil Passes Away | पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

Pandit Birju Maharaj Passes Away | प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज यांचे निधन

Ibrahim Ashq | ‘कहोना प्यार है’, ‘क्रिश’, ‘वेलकम’ चित्रपटांचे गीतकार इब्राहिम आश्क यांचे ‘कोरोना’मुळे निधन

Related Posts