IMPIMP

Pune Municipal Corporation Elections | आगामी पालिका निवडणुकीत BJP सत्तेपासून दूर? महाविकास आघाडी एकत्र लढणार?

by nagesh
Pune Amenity Space | BJP corporators split over proposal to lease amenity space

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  सन 2022 मध्ये महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पुणे पालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, भाजपाला (BJP) येणारी पालिका निवडणूक (Pune Municipal Corporation Elections) आव्हानात्मक असणार आहे. राज्यात असणाऱ्या तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मोट सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेत दिसून येणार का? यासाठी खटाटोप सुरु आहे. मात्र, यासंदर्भात काही ठोस निर्णय झाला नाही. मात्र यात भाजपचं (BJP) टेन्शन वाढल्याचं दिसत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्यात काँग्रेस (Congress), शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) या तिन्ही पक्षाचं मिळून सरकार आहे. तर राज्याप्रमाणे स्थानिक ठिकाणी देखील हे तिन्ही पक्ष एकत्र लढल्यावर भाजपासाठी आगामी निवडणूक अडचणीची जाऊ शकते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात पुणे पालिकेत भाजपने एकहाती सत्ता संपादन केली होती. त्यावेळी साधारण 90 च्या पुढे नगरसेवकांनी विजयी मिळवला होता. मात्र, एका सर्व्हेनुसार एक माहिती समोर आली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप (BJP) बहुमतापर्यंत जाण्याची शक्यता कमी आहे. असं एका सर्वेचा निष्कर्ष समोर आलाय. विशेष म्हणजे हा सर्व्हे भाजपनेच केल्याने भाजप नेत्यात अस्वस्थता पसरली आहे.

काही दिवसांअगोदरच हे सर्वेक्षण केलं आहे. काही नेत्यांमध्ये याबाबत माहिती होती. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal elections) भाजपाला अधिकाधिक 75 ते 80 जागा मिळण्याची शक्यता या अहवालातून समोर आले आहे. तसेच, भाजपने 2014 पासून राज्यात अनेक जिल्ह्यात आपलं स्थान मजबूत केलं आहे. याचबरोबर पुण्यात देखील गेल्या निवडणुकीत यश मिळवलं आहे. दरम्यान, पुणे पालिकेत एकूण 164 जागा आहेत. त्यातील 90 हुन जास्त जागा भाजपने जिंकलं होतं. पुणे पालिकेत बहुमतासाठी साधारण 84 सदस्यांची आवश्यकता आहे. त्यावेळी भाजपने बहुमताचाआकडा गाठला होता. मात्र, सध्याच्या सर्व्हेतून भाजप त्या आकड्यापासून दूर जाताना दिसत आहे. यासाठी भाजप (BJP) स्थानिक नेत्यांनी पक्षाची मोट बांधण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

या दरम्यान, आगामी पुणे पालिकेत निवडणूक (Election in Pune Municipality) रणधुमाळीत राष्ट्रवादीने जोरदार तयारी केलीय. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे, पिंपरी चिंचवडवर विशेष लक्ष दिले आहे. त्याचबरोबर शिवसेनेने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) झाल्यास 80 जागा हव्यात अशी देखील मागणी केली आहे. तसेच, शिवसेना नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं आहे. तर, जागेच्या वाटपावरून महाविकास आघाडीत काही बिघाडी झाली तर पालिकेत झेंडा कोणाचा? हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.

– पुणे महानगरपालिका पक्षीय बलाबल :

– भाजपा (BJP) – 99

– राष्ट्रवादी – (Nationalist) – 44

– काँग्रेस (Congress) – 9

– शिवसेना – (Shiv Sena) – 9

– मनसे – (MNS) – 2

– एमआयएम – (MIM) -1

– एकूण : 164

Web Title : Pune Municipal Corporation Elections | bjp away power not getting majority pune election benefits shivsena ncp congress

हे देखील वाचा :

Corona in Pune | लसीकरणानंतरही पुणे जिल्ह्यात आढळले 7 हजार 636 ‘कोरोना’बाधित

Sandwich Pregnancy | सँडविचमुळे महिला झाली प्रेग्नंट? खाताच केली प्रेग्नंसी टेस्ट तर निघाली 5 महिन्यांची गरोदर

Kidney Transplant | व्यक्तीच्या शरीरात आहेत 5 किडनी; डॉक्टरांनी केला असा चमत्कार जाणून हैराण व्हाल तुम्ही !

Pune Police | सराईत गुंडावर MPDA कायद्याखाली कारवाई, गुंड योगेश गायकवाडची येरवड्यात रवानगी

Related Posts