IMPIMP

Pune-Nashik Railway | पुणे-नाशिक रेल्वेने मार्गाने पकडली गती; 12 पैकी 7 गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण

by nagesh
Pune-Nashik Railway | land survey for pune nashik railway started

पुणे(Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) कोरोनाच्या दीड वर्षाच्या कालावधीनंतर पुण्यातील विकासकामांनी (Development work in Pune) पुन्हा एकदा जोर पकडला आहे. रिंगरोड (Ringroad) पाठोपाठ आता बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक (Pune-Nashik Railway) सेमी हायस्पीड रेल्वे (semi highspeed) प्रकल्पासाठी जमीन मोजणीचे (Land Survey) काम युद्धपातळीवर सुरु आहे. हा मार्ग हवेली तालुक्यातून (Haveli) जात असून 12 पैकी 7 गावातील भूसंपादनाचे (land acquisition) काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वे (Pune-Nashik Railway) मार्गाच्या कामाला गती आल्याचे पहायला मिळत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भूसंपादनासाठी दीड हजार कोटींचा निधी

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही त्यामुळे गती मिळणार असल्याने राज्य सरकारचा (State Government) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी तीन जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 470 हेक्‍टर जमीन संपादित करण्यात येणार असून पुणे जिल्ह्यातील (Pune district) हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्‍यातून 575 हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन करावे लागणार. यासाठी एक हजार 300 ते दीड हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

8 गावांमधील मोजणीचे काम पूर्ण

हवेलीमधील 12 गावामधून हा रेल्वे मार्ग जात असून यामध्ये हडपसर, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रूक, कोलवडी, साष्टे, बकोरी, वाडे बोल्हाई, तुळापूर, लोणीकंद, केसनंद, पेरणे, बावडी या गावांचा समावेश आहे. या गावातील भूसंपादन असून आतापर्यंत कोलवडी, साष्टी, मांजरी खुर्द, तुळापूर, पेरणे, वाडेबोल्हाई आणि बावडी या गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाल्याचे भूसंपादन अधिकारी रोहिणी आखडे (Rohini Akhade) यांनी सांगितले. हवेली तालुक्यातील 12 गावांमधील सुमारे 131 हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. सध्या पावसामुळे जमीन मोजणीच्या कामाला विलंब होत आहे. परंतु पुढील महिन्यापर्यंत हवेली तालुक्यातील गावांतील जमिनीच्या मोजणीचे काम पूर्ण होईल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

मार्गावर 18 बोगदे, 41 उड्डाणपूल

पुणे-नाशिक या रेल्वे मार्गाची लांबी 235 किलोमीटर इतकी असून रेल्वेचा वेग 200 किमी (प्रतितास)
इतका राहील यामुळे पुणे नाशिक अंतर हे अवघ्या पावणेदोन तासांत पूर्ण होईल. या मार्गावर 18
बोगदे, 41 उड्डाणपूल, 128 भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आले असून एकूण 24 स्थानकांची आखणी केली आहे. या प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा आहे.

Web Title : Pune-Nashik Railway | land survey for pune nashik railway started

हे देखील वाचा :

IIT Bombay Recruitment 2021 | मुंबईच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘या’ पदांसाठी लवकरच भरती

LIC Saral Pension Plan | एलआयसीच्या ‘या’ योजनेत गुंतवा एकदाच पैसे आणि मिळवा दरमहा 12 हजार रुपये; जाणून घ्या ‘हे’ 6 फायदे

Union Home Ministry | केंद्राच्या राज्यांना महत्वाच्या सूचना; 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कडक ठेवा

Related Posts