IMPIMP

Pune NCP | राष्ट्रवादीकडून बाणेर-बालेवाडी प्रभाग क्र.9 च्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथे गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

by nagesh
Pune NCP | NCP organizes Gauri Decoration Competition at Baner, Balewadi, Sus, Mahalunge on behalf of Baner-Balewadi Ward No.9

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Pune NCP) बाणेर-बालेवाडी प्रभाग क्र.9 च्या (Baner-Balewadi Ward No.9) वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथे गौरी सजावट स्पर्धेचे (Gauri Decoration Competition) आयोजन करण्यात आले होते. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP) पक्षाच्यावतीने 2006 पासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र, यंदाच्यावर्षी मोठ्या उत्साहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदाच्यावर्षी कोरोना नियमांचे पालन करुन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या ‘गौरी सजावट स्पर्धेचा’ उपक्रम बाणेर-बालेवाडी या परिसरातील नागरिकांसाठी नगरसेवक बाबुराव चांदेरे (Corporator Baburao Chandere) यांनी सुरू केला आहे आणि हा उपक्रम आज तागायत चालू आहे. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे स्पर्धा होऊ शकली नाही म्हणून यंदा तो उत्साह अधिक दिसून आला. महिलांनी गौराईपुढं मोठ्या प्रमाणात आकर्षक सजावट केली होती.
त्या अनुषंगाने काल बाणेर-बालेवाडी आणि नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) समाविष्ट झालेल्या सुस (Sus) व म्हाळुंगे (Mahalunge) या दोन्हीं गावामध्ये
सुद्धा गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या गौरी सजावट स्पर्धेमध्ये जवळपास 900 महिलांनी सहभाग नोंदविला होता .

कमी वेळेत या स्पर्धे करिता प्रत्यक्षात 22 कॅमेरामन शूटिंग घेण्यासाठी ठेवण्यात आले होते.
आणि जवळपास 70 ते 80 कार्यकर्ते आणि परीक्षक ह्या सर्व जणांनी मिळून जवळपास 826
महिलांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन गौरी सजावटीचे परीक्षण केले.
परंतु आम्ही ज्यांच्या पर्यंत पोहचू शकलो नाही आशा काही गौरी सजावटीचे फोटो प्राप्त झाले आहेत.
या स्पर्धेसाठी महिलांनी प्रचंड उत्कृष्ट असा प्रतिसाद या स्पर्धेकरिता दिला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या स्पर्धेचे सुस भागात संगिता बाळासाहेब भोते, म्हाळुंगे मध्ये समृध्दी विवेक खैरे, बालेवाडी भागात
दिप्ती राजेश बालवडकर, बाणेर मध्ये पोर्णिमा तानाजी मांडेकर, विधाते-मुरकुटे वस्ती या परिसरात वासंती रेणुसे या ठिकाणी स्पर्धेचे औपचारिक उदघाटन केले.
उद्घाटन प्रसंगी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक आणि या कार्यक्रमाचे आयोजक बाबुराव चांदेरे, नितीन कळमकर, डॉ.सागर बालवडकर, चेतन बालवडकर, रुपाली सागर बालवडकर, पुनम विशाल विधाते, सुषमा ताम्हाणे, कविता बोरावके, राखी श्रीराव, डॉ .मीना विधाळे, माधुरी इंगळे, प्राची सिद्दकी,
वैशाली कलमानी, जान्हवी मनोज बालवडकर, अश्विनी समिर चांदेरे, पुजा किरण चांदेरे,
प्राजक्ता ताम्हाणे आदी महिला व कार्यकर्ते उपस्थित होते .

या गौरी सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 2 ऑक्टोबर रोजी, सायंकाळी 4 वाजता
बाणेर येथील बंटारा भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.

Web Title : Pune NCP | NCP organizes Gauri Decoration Competition at Baner, Balewadi, Sus, Mahalunge on behalf of Baner-Balewadi Ward No.9

हे देखील वाचा :

EPFO | पीएफ खातेधारकांना मिळणार ‘ही’ सुविधा, आता एक तासात काढा पैसे, जाणून घ्या नियम

Madras High Court | वाहन खरेदीदारांना मोठा दिलासा ! कार खरेदीवर पाच वर्षाची विमा सक्ती नाही – उच्च न्यायालय

Greenfield Expressway | आता दिल्ली-मुंबई प्रवास केवळ 13 तासात, वर्षाला 32 कोटी लिटर इंधन वाचणार

Related Posts