IMPIMP

Pune News | मतदार कमी असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये निवडणूका घेण्याचा निर्णय – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | ...Then economic crisis in the state - Ajit Pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | कोरोनाचे संकट अजून टळले नाही. ३१ ऑगस्टपर्यंत गृहनिर्माण सोसायट्यांसह सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. ती मुदत आता संपत येत असल्याने ज्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदार संख्या कमी आहे, त्याठिकाणी कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करून निवडणुका घेण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, हजारोंच्या संख्येने मतदार असलेल्या सोसायट्या आणि इतर संस्थांबाबत गांभीर्याने विचार करून पावले टाकली जातील, असेही त्यांनी यावेळी (Pune News) स्पष्ट केले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पवार म्हणाले, कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षी राज्य सरकारने निवडणूका ३१ डिसेंबर २०२०पर्यंत पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत या निवडणूका पुढे ढकलल्या. सततच्या मुदतवाढीमुळे बहुतांश सोसायट्यांमधील पदाधिकारी त्रासले आहेत. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सोसायट्यांच्या सभासदांकडून करण्यात येत होती.

राज्यातील गृहनिर्माण संस्था :  सुमारे एक लाख

अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था :  ८५ हजार

पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्था :  १८ हजार

अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था :  १५ हजार

Web Title : Pune News | decision to hold elections for housing societies Ajit Pawar

हे देखील वाचा :

Jan Ashirwad Yatra | उन्होंने हवा कर दी सर ! जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंना बड्या नेत्याचा ‘कॉल’, बातचीत व्हायरल

Covid-19 Protocol | सणासुदीचे दिवस पाहता केंद्र सरकार सतर्क ! देशभरात 30 सप्टेंबरपर्यंत वाढवला कोरोना ‘प्रोटोकॉल’चा कालावधी

Rain in Maharashtra | उद्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळणार; 30 ऑगस्टला ‘या’ जिल्ह्यात Alert

Related Posts