IMPIMP

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला पुणे पोलिसांचा समाचार, म्हणाले…

by sikandershaikh
dycm-ajit-pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पोलिसांचा वचक सर्वसामान्य नागरिकांवर नाही, तर चोर आणि गुन्हेगारावर पाहिजे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची निघालेली मिरवणूक आणि चोरट्यांना पाहून पळालेले पोलीस यावरून पुणे पोलिसांचा समाचार घेतला.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं गुन्हा, चोरी घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. लवकरच मोठी पोलीस भरती, पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पवारांनी सावध भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. संजय राठोड यांना पत्रकार परिषद घेण्यास सांगेन असं म्हणत त्यांनी यावर अधिक काही बोलणं टाळलं.

पुढं बोलताना त्यांनी सांगितलं की, महाविकास आघाडी सरकारला सध्यातरी कोणताही धोका नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारचं कामकाज सुरू आहे.
तसंच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतही संभाषण सुरू असतं. तिन्ही पक्ष एकोप्यानं काम करत आहेत.
सगळेजण चर्चा विनिमय करून निर्णय घेत आहेत असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

Related Posts