IMPIMP

Pune News : गुंड शरद मोहोळ व 4 साथीदारांना जामीन

by Team Deccan Express
Sharad Mohol

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)शक्ती प्रदर्शन करीत दहशत निर्माण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) आणि त्याच्या चार साथीदारांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. शेख यांनी हा आदेश दिला.

खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर पडल्यावर गुंड शरद मोहोळ याने गेल्या एका कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन केल्याप्रकरणी त्याच्यासह पाच जणांना खडक पोलिसांनी मंगळवारी (ता.16) रात्री अटक केली आहे. गुंड शरद हिरामण मोहोळ (वय ३८), विश्वास बाजीराव मनेरे (वय ३७), मनोज चंद्रकांत पवार (वय ४२), स्वप्नील अरुण नाईक (वय ३५) आणि योगेश भालचंद्र (वय ४०) यांना अटक करण्यात आली होती. तर अक्षय भालेराव, सीताराम खाडे, दिनेश भिलारे, मंगेश धुमाळ यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहोळ (Sharad Mohol) याला एका संघटनेच्या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी २६ जानेवारी रोजी त्याला बोलविण्यात आले होते. त्या कार्यक्रमास मोहोळ व त्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे आले होते. तेव्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही. आरोपींनी आकडाआरडा करून दहशत निर्माम केली. त्यामुळे नागरिक घाबरून पळाले होते. त्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारच्या वतीने सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी युक्तिवाद केला.
आरोपींच्यावतीने ऍड. अमोल ढमाले, ऍड. मनीष पाडेकर, ऍड. संजय साळुंखे आणि ऍड. अश्विनी खंडाळे यांनी बाजू मांडली.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी :

शरद मोहोळ (Sharad Mohol) हा कुख्यात गुंड असून त्याची शहरात दहशत आहे.
संबंधित कार्यक्रमाच्या वेळी कार आणि दुचाकीवरून येत त्यांनी गुरुवार पेठेतील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली.
त्याठिकाणी एकत्रित येऊन आरोपींचा कोणते गैर कृत्य करण्याचा उद्देश होता का? याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
गुन्ह्यात वापरलेली वाहने आरोपींकडून जप्त करायची आहेत.
तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करायची असल्याने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी
देण्याची मागणी खडक पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक गुन्हे हर्षवर्धन गाडे यांनी आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

Related Posts