IMPIMP

Pune News | मंगळवार पेठेतील कै. भागुजीराव बारणे शाळा स्थलांतरीत करू नये; शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे यांची मागणी

by nagesh
Pune News | Late on Tuesday. Bhagujirao Barne should not migrate to school; Demand of Shiv Sena corporator Pallavi Jawale

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंगळवार पेठेतील महापालिकेच्या (Pune Corporation) कै. भागुजीराव अनाजीराव बारणे विद्यालयाचे (शाळा क्र. १५) स्थलांतर करू नये, अशी मागणी स्थानीक नगरसेविका पल्लवी जावळे (Corporator Pallavi Jawale) यांनी केली आहे. या शाळेत मंगळवार पेठ परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील तब्बल २५० विद्यार्थी शिक्षण घेत असून ही शाळा अन्यत्र स्थलांतरीत केल्यास त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, अशी भिती जावळे यांनी व्यक्त (Pune News) केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

जावळे यांनी यासंदर्भात निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. त्यामध्ये कै. भागुजीराव बारणे शाळा या पसिरातील जुनी शाळा असून यामध्ये २००९ पासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासाठी ही शाळा स्थलांतरीत करण्यासाठी महापालिका स्तरावर हालचाली सुरू आहेत. शाळेच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर १२ आणि दुसर्‍या मजल्यावर १२ अशा वर्गखोल्या आहेत. यापैकी एका मजल्यावर इंग्रजी माध्यमांचे तर एका मजल्यावर मराठी माध्यमांची शाळा भरते. वैद्यकीय महाविद्यालयाला यापैकी १२ वर्गखोल्या देउनही एका मजल्यावर दोन सत्रात शाळा सुरू ठेवता येउ शकते. मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठेतील सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ही शाळा मध्यवर्ती असल्याने सोयीची आहे. त्यामुळे या शाळांचे येथून स्थलांतर करू नये, अशी विनंती महापालिका आयुक्तांना करण्यात आल्याचे पल्लवी जावळे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title : Pune News | Late on Tuesday. Bhagujirao Barne should not migrate to school; Demand of Shiv Sena corporator Pallavi Jawale

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 144 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

New Labour Code | 1 ऑक्टोबरपासून बदलणार कामगार कायदा, इनहँड सॅलरीवर होणार परिणाम, 12 तास काम!

Anti-Corruption | इचलकरंजीत 3 लाखाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप

Related Posts