IMPIMP

Pune News | मुस्लिम बांधवांच्या वतीने मानाच्या गणपतींच्या महाआरतीचे आयोजन; कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणाले – ‘पुण्यातील गणेशोत्सव हा सामाजिक सलोख्याचा आदर्श’

by nagesh
Pune News | Organizing Maha Aarti of Manache Ganapati on behalf of Muslim brothers; Kasba Ganpati President Shrikant Shete said - 'Ganeshotsav in Pune is an ideal of social harmony'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | जगप्रसिद्ध ठरणाऱ्या पुण्यनगरीच्या गणेशोत्सवाची (pune ganesh festival) अनेक वैशिष्ट्ये आहेत. सर्वधर्मीय बांधवांचा सक्रिय सहभाग ही त्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती चे अध्यक्ष श्रीकांत शेटे (Shrikant Shete, President of Kasba Ganpati) यांनी व्यक्त केले.

मुस्लिम औकाफ वेलफेअर ट्रस्टच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या वतीने पुण्यातील मानाच्या
गणपतींच्या महाआरती चे आयोजन करण्यात आले होते , त्याप्रसंगी शेटे बोलत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

गेली सोळा वर्षे मुख्य गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मुस्लिम बांधवांच्या वतीने बेलबाग चौकात गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे सन्मान व गणपतीची आरती करण्यात येते पण गेली दोन वर्षे कोरोनामुळे
हा योग आला नव्हता म्हणून यंदा मंडळांमध्ये जाऊन मुस्लिम बांधवांनी बाप्पाची महाआरती केली.
पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई (Trustee of Pune Police Vighnaharta Trust Dr. Milind Bhoi) यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम गेली 16 वर्षे राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे संयोजक मुस्लिम औकाफ ट्रस्टचे अध्यक्ष मुस्ताक पटेल (Mustaq Patel, president of the Muslim Awqaf Trust) यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) हा सर्व धर्मांच्या उत्साहाचा मानबिंदू असून आम्हाला सर्वांनाच यामध्ये त्यामध्ये सहभागी होताना मनस्वी आनंद होतो.
दरवर्षी मिरवणुकीत पोलीस (Pune Police) बांधवांना व गणेश भक्तांना मुस्लिम बांधवांच्या वतीने श्रमपरिहार म्हणून शीरखुर्मा देण्यात येतो तसेच रमजानमध्ये अनेक मुस्लीम बांधव मोदक खाऊन उपवास सोडतात ही आपली संस्कृती असून त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे असे स्पष्ट केले.
या प्रसंगी मानाच्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, प्रविण परदेशी, विकास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन युसूफ बागवान, हाजी इक्बाल तांबोळी, बाबर शेख, आबू तांबे, अली भाई सैयद,
तौसिफ कुरेशी, युसुफ चाबी वाले , अ‍ॅड. मारूफ पटेल, इक्बाल दरबार अ‍ॅड. जाकीर अत्तार यांनी केले.

Web Title : Pune News | Organizing Maha Aarti of Manache Ganapati on behalf of Muslim brothers; Kasba Ganpati President Shrikant Shete said – ‘Ganeshotsav in Pune is an ideal of social harmony’

हे देखील वाचा :

Satara Crime | पतीला निलंबित केल्याने पत्नीने घातला थेट ‘CEO’ च्या दालनात ‘राडा’

Maharashtra Rains | विकेंडपासून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ 4 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट

Pune Crime | चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; वारजे माळवाडीच्या रामनगर येथील घटना

Mumbai Crime | मुंबईतील जोगेश्वरीमधून एक दहशतवादी अटकेत

Related Posts