IMPIMP

Pune News | पुणे जिल्हा बँक शेतकऱ्यांना आधार देणारी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

by nagesh
Pune News | Pune District Bank to support farmers Minister of State Dattatraya Bharane

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार देणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक (Pune District Central Bank) असून बँकेच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. (Pune News | Pune District Bank to support farmers Minister of State Dattatraya Bharane)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

लासुर्णे (ता. इंदापूर) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एटीएम सेवेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सचिन सपकाळ, ॲड. तेजसिंह पाटील, डॉ. योगेश पाटील, सरपंच सागर पाटील, बाळासाहेब सपकळ, सोमनाथ निंबाळकर, राजेश खरात, विभागीय अधिकारी आनंद थोरात, लासुर्णे शाखा व्यवस्थापक बाळासाहेब थोरात, विकास अधिकारी सुदाम खरात उपस्थित होते.

राज्यमंत्री भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना कधीच पाणी कमी पडू देणार नसल्याचे सांगत पाण्यासाठी नियोजन करण्यात येत असून तालुक्यातील २२ गावांसह शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
महिलांना डोक्यावरून हंडा घेऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागते.
त्यामुळे गावोगावी पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
लासुर्णे परिसरात ९ कोटी ७० लाख रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना उभारण्यात येणार असून त्यासाठी निधी ही मंजूर झाला आहे.
तसेच लहीरोबानगर -कर्दनवाडी- मोहितेवाडी- मानकरावाडी मार्गे उद्घटला जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याचेही भरणे यांनी सांगितले.

Web Title : Pune News | Pune District Bank to support farmers Minister of State Dattatraya Bharane

हे देखील वाचा :

Pune Ganesh Festival | राष्ट्रीय एकात्मतेबरोबर अर्थव्यवस्थेला चालना देणारा उत्सव

Health Department Circular 2021 | उपचारात दिरंगाई होऊन मृत्यू झाल्यास डॉक्टरचं होईल निलंबन

Amruta Fadnavis | ‘…तेव्हा काही लोकं मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात’ – अमृता फडणवीस

Related Posts