IMPIMP

Pune News | ‘ई-फेरफार’ योजनेत आता ‘प्रॉपर्टी कार्डचाही समावेश

by nagesh
Pune News | The e Ferfar scheme now includes a property card

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | भुमी अभिलेख विभागाकडून (land records department) अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आणि सुविधा ऑनलाइनच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. त्यानुसार पुणे शहरातील (Pune News) मिळकतींची खरेदी, हक्‍कसोडपत्र अथवा बक्षीसपत्र केले असेल तर प्रॉपर्टी कार्डवर (property card) त्यांची नोंद घेण्यासाठी आता सिटी सर्व्हेच्या कार्यालयात (City Survey Office) लोकांना हेलपाटे मारण्याची आवश्यकता लागणार नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे, दस्तनोंदणी झाल्यानंतर ऑनलाइनद्वारे संबंधित जमिनीच्या 7/12 आणि फेरफार उताऱ्यात नोंद घेणाऱ्या ‘ई-फेरफार’ या योजनेमध्ये आता प्रॉपर्टी कार्डचा देखील समावेश केला गेला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सध्याच्या भुमी अभिलेख विभागाने (land records department) ऑनलाइनच्या माध्यमातुन देत असणा-या सुविधामुळे नागरीकांना याचा अधिक फायदा होणार आहे. दरम्यान या नव्या नियमांनुसार एखाद्या मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर फक्त 21 दिवसांत त्या मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवर (property card) ऑनलाइनद्वारे फेरफारची नोंद घेतली (Pune News) जाणार आहे. दरम्यान, कार्यालयात तिन्हीपैकी कोणतेही दस्तनोंदणी केल्यानंतर ऑनलाइन त्यांची माहिती सिटी सर्व्हे कार्यालयात जाणार आहे.

भूमि अभिलेख विभागाने विविध प्रकारच्या सेवा ऑनलाइन देण्यावर भर दिला आहे.
याआधी ग्रामीण भागातील जमिनी खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यावर खरेदीदाराची 7/12 उताऱ्यावर नोंद होण्यासाठी ई-फेरफार योजना सुरू करण्यात आली.
मात्र, राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये 7/12 उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे.
प्रायोगिक तत्वावर राज्यात 6 जिल्ह्यांत ही योजना भूमी अभिलेखाद्वारे प्रांरभ केली आहे.
त्यात आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune and Pimpri-Chinchwad) शहरांचा ही समावेश करण्यात आला. या निर्णयामुळे आता नागरीकांच्या पैशाला भुर्दंड बसणार नाही.
तसेच नागरिकांना कार्यालयात हेलपाटाही बंद होणाार आहे.
त्याचबरोबर गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे. यावरुन ऑनलाइन ई-फेरफार करण्यासाठी
‘एनआयसी’ च्या सहाय्याने संगणकीय प्रणाली (Computer system) तयार करण्यात आली आहे.

हरकतीसाठी केवळ 15 दिवस –

प्रापर्टी कार्डवरील मिळकतीची खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर याची माहिती ऑनलाइनच्या माध्यमातून भूमि अभिलेख कार्यालयाला येणार आहे.
त्यानंतर त्याची छाननी होऊन लगेचच टिपण्णी होऊन मंजूर नोटीस तयार होणार आहे.
तसेच, मेल आयडी असतील त्यांना ई-मेलने आणि ज्यांचे पत्ते असतील त्यांना टपालाने पाठविण्यात येणार आहे. ही सर्व प्रकिया ऑनलाइन आणि एकाच दिवसात होणार आहे.
यातील, नोटीसवर हरकत देण्यासाठी 15 दिवस वेळ देण्यात येणार आहे.

Web Title : Pune News | The e Ferfar scheme now includes a property card

हे देखील वाचा :

Gold Price Today | खुशखबर ! 10,000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

Pune ACP Transfers | पुण्यात नव्याने हजर झालेल्या ACP विजयकुमार पळसुले आणि ACP राजेंद्र साळुंके यांची ‘या’ विभागात नियुक्ती

Pune Crime | लग्नाच्या आमिषाने 25 वर्षीय तरुणीला लोणावळा, वडकी, भेकराईनगर येथील लॉजवर फिरवलं, केला बलात्कार ! ‘त्या’ गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरासह दोघे ‘गोत्यात’

Related Posts