IMPIMP

Pune news । अल्पवयीन मुलाला धमकी देत करायला लावले अनैसर्गिक कृत्य, एकाला पोलिसांकडून अटक

by omkar
Pune News

पुणे : Pune news – सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे येथील एका अल्पवयीन मुलाला (minor boy)एकाने पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन तेथे गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देत अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले.
हा प्रकार मंगळवारी सकाळच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणावरून स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) आरोपीला अटक केली आहे.
रवींद्र ऊर्फ बल्ली कांबळे (Ravindra Kamble) (वय, 32 रा. डायन प्लॉट, गुलटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी एका 15 वर्षाच्या मुलाने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

Petrol Diesel Price Rise| एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या आजचे दर(Pune news)

अधिक माहितीनुसार, रवींद्र कांबळे या व्यक्तीने दोन मुलांना नाष्टा करण्याच्या बहाण्याने सेव्हन लव्ह चौकातून दुचाकीवर बसवून पुनावाला गार्डन येथील स्मशानभूमीजवळ नेले.
तेथे त्यांच्यातील एका मुलाला कांबळे याने दारु आणण्यासाठी घालवले.
यानंतर त्याने या अल्पवयीन मुलाला अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडले.
जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचा गळा दाबून केस ओढले व त्याला अनैसर्गिक कृत्य (unnatural acts) करायला भाग पाडले.
अल्पवयीन मुलाने त्याला विरोध केल्यावर त्याचा गळा दाबून केस ओढले. ‘मी सांगतो तसे केले नाही तर, तुला जिवंत मारुन टाकून स्मशानभूमीत पुरुन टाकीन’ अशी धमकी दिली.

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

या दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणावरून रवींद्र कांबळे याच्यावर अपहरण (kidnapping), खुनाचा प्रयत्न (attempt to murder) आणि अनैसर्गिक कृत्य (unnatural acts) करायला भाग पाडणे,
पोक्सो (POCSO) अशा वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Governor appointed MLA | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडेच असल्याची माहिती समोर 

Related Posts