IMPIMP

Pune-Pimpri Chinchwad Police | पुणे अन् पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात मोठे बदल, पिंपरी ‘अपग्रेड’ होणार?

by nagesh
Pune-Pimpri Chinchwad Police | Major changes in Pune and Pimpri-Chinchwad Police Commissionerate, Pimpri to be upgraded?

नितीन पाटील (Nitin Patil): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  राज्य पोलिस दलात सध्या मोठया प्रमाणावर बदल्यांची चर्चा सुरू असतानाच पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात (Pune-Pimpri Chinchwad Police) देखील मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी ‘पोलीसनामा’ ऑनलाइनला दिली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या प्रमुखपदी अप्पर पोलिस महासंचालक (additional director general of police) ADG दर्जाच्या अधिकार्‍याची नेमणुक केली जाण्याची असल्याची दाट शक्यता आहे.. त्याबाबत सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. आगामी काही दिवसातच पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस (Pune-Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयातील पोलिस निरीक्षक ते अति वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नियुक्त्या वेगवेगळया ठिकाणी केल्या जाणार आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे पोलिस आयुक्तालयात देखील मोठे फेरबदल होणार आहेत. त्याबाबतचे संकेत अति वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मिळत आहेत.
दरम्यान, पोलिस उपायुक्त (deputy commissioner of police) आणि इतर वरिष्ट दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या होणार राज्य सरकारकडून (maharashtra government) होणार आहेत. त्यामध्ये देखील अनेकांना ‘धक्का’ बसण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या प्रमुखपदी म्हणजेच आयुक्तपदी अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्याबाबत देखील जोरदार हालचाली सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड आयुक्त पदासाठी काही नावे चर्चेत देखील येत आहेत.
मात्र, त्यास अंतिम स्वरूप (ऑर्डर) आगामी काही दिवसात मिळण्याची दाट शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात सध्या अप्पर पोलिस आयुक्तांचे एकच पद आहे.
तिथं आता अप्पर पोलिस आयुक्तांची दोन पदे देण्यात यावी अशी शिफारस देखील करण्यात आल्याचं कळतंय.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या पुण्याच्या
‘आवती-भवती’च (पुणे शहरात कार्यरत असलेल्या वेगवेगळया पोलिस विभागात) होणार असल्याची
चर्चा सध्या पोलिस वर्तुळात आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयातील बदल्यांमध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुढच्या आठवडयामध्ये मोठे बदल होणार असल्याचं कळतंय.
पुणे आयुक्तालयातील ज्या अधिकार्‍यांचा कार्यकाळ संपलेल्या आहे त्यांच्या तर बदल्या होणारच आहेत मात्र इतर काही अधिकार्‍यांच्या देखील बदल्या होणार असल्याची चर्चा आहे.
काही पोलिस अधिकार्‍यांना मुदतवाढ मिळाली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
मात्र, पोलिस महासंचालक कार्यालयातील अति वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘नो-एक्सटेन्शन अन् नो-मॉडिफिकेशन’ ही पॉलिसी अवलंबिण्याची शिफारस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांच्याकडे केली आहे..
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देखील ‘नो-एक्सटेन्शन अन् नो-मॉडिफिकेशन’ पॉलिसीला ‘ग्रीन सिग्नल’ दिला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

अप्पर पोलिस महासंचालकांच्या बदल्यांची यादी तयार?

राज्यातील सर्वच अप्पर पोलिस महासंचालकांची त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार यादी तयार करण्यात आली आहे. तयार करण्यात आलेल्या ‘त्या’ यादीवर सध्या ‘मंथन’ सुरू आहे.
अलिकडील काळात अप्पर पोलिस महासंचालक (ADG) बनलेल्या अन् कार्यकारी पदावर कार्यरत असलेल्या तसेच सेवा ज्येष्ठता असताना देखील अकार्यकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांच्या नावांवर ‘मंथन’ करण्यात आले असून त्यांच्या बदल्यांबाबत देखील लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

‘नो-एक्सटेन्शन अन् नो-मॉडिफिकेशन’ पॉलिसीचा फटका?

‘नो-एक्सटेन्शन अन् नो-मॉडिफिकेशन’ पॉलिसीचा फटका काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना
बसणार आहे. सध्या ते ज्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना त्याच ठिकाणी कार्यरत रहावे लागणार आहे.
पोलिस महासंचालक कार्यालयातील अति वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘एक्सटेन्शन अन् -मॉडिफिकेशन’ला फूल स्टॉप देवून कोणत्याही अधिकार्‍यांना ‘एक्सटेन्शन अन् -मॉडिफिकेशन’ देण्याची गरज नसल्याचं
संबंधितांना सांगितलं आहे.
त्यामुळे इच्छा नसताना देखील काही वरिष्ठ अधिकार्‍यांना आहे ‘त्या’ पदावरच कार्यरत रहावे लागणार आहे.

Web Title : Pune-Pimpri Chinchwad Police | Major changes in Pune and Pimpri-Chinchwad Police Commissionerate, Pimpri to be upgraded?

हे देखील वाचा :

Mansukh Hiren Murder Case | मनसुख यांची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाखाचा व्यवहार; NIA चा मोठा खुलासा

Influenza Vaccine | कोरोना महामारीमध्ये इन्फ्लूएंजा व्हॅक्सीन देतंय सुरक्षा ‘कवच’, Covid च्या गंभीर प्रभावांपासून करतंय ‘बचाव’ – संशोधन

Maharashtra Police | राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल, सर्वच अप्पर महासंचालकांचं (ADG) ‘समाधान’ होणार !

Related Posts