IMPIMP

Pune Pimpri Crime | क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

by nagesh
Pune Pimpri Crime | Cricket match bet taker arrested by crime branch

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | क्रिकेट सामन्यावर सट्टा (Betting on Cricket Match) घेणाऱ्या एकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri-Chinchwad Police) गुन्हे शाखेच्या (Crime Branch) दरोडा विरोधी पथकाने (Anti-Robbery Squad) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून 1 लाख 14 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई (Pune Pimpri Crime) चिंचवड येथील मोहननगर येथे मंगळवारी रात्री 10.20 च्या सुमारास केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विनायक कृष्णा शेलार Vinayak Krishna Shelar (वय-50 रा. शेलार चाळ, मोहननगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा (Maharashtra Gambling Prohibition Act), इंडियन टेलिग्राफ अ‍ॅक्ट नुसार (Indian Telegraph Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

दरोडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना मोहननगर येथे एक व्यक्ती भारत- वेस्ट इंडीज (India-West Indies) टी-20 सामन्यावर (T-20 Match) सट्टा घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले (Senior Police Inspector Ramdas Ingwale) यांना मिळाली. पथकाने रात्री 10.20 च्या सुमारास मोहननगर येथे सापळा रचून आरोपी विनायक शेलार याला ताब्यात घेतले. आरोपी त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये CRICKET MAZZA, Cricket Line Guru या अ‍ॅपद्वारे बेटिंग घेत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून 1 लाख 14 हजार 540 रुपयांचे 6 मोबाईल जप्त केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde), अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addl CP Dr. Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. काकासाहेब डोळे (DCP Dr. Kakasaheb Dole ), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr. Prashant Amritkar),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanvat)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे (API Siddheshwar Kailase),
मनिषा हाबळे (API Manisha Hable), पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे(PSI Mangesh Bhange),
पोलीस अंमलदार विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, गणेश सावंत, गणेश कोकणे, विनोद वीर,
प्रविण माने, उषा दळे, नम्रता सकट व आशा लोमटे यांच्या पथकाने केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Pimpri Crime | Cricket match bet taker arrested by crime branch

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रकृती बिघडली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना; शहा, नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता

Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊतांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढला

Shinde Government | शिंदे सरकारचा मविआला आणखी एक धक्का, निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत

Related Posts