IMPIMP

Pune Pimpri Crime | बेपत्ता झालेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

चाकण : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | मावळ तालुक्यात (Maval Taluk) बेपत्ता अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) मृतदेह आढळून (Dead Body) आल्याची घटना ताजी असतानाच खेड तालुक्यात (Khed Taluka) अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. घरातून बेपत्ता (Missing) असलेल्या 4 वर्षाच्या मुलीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील विवस्त्र मृतदेह आढळून आला आहे. ही घटना खेड तालुक्यातील मेदनकरवाडी गावच्या हद्दीत मुलीच्या राहत्या घराच्या मागील बाजूस गुरुवारी (दि. 11) उघडकीस आली. बिहारमधून कामासाठी आलेल्या दाम्पत्याची ही मुलगी असून तीन दिवसांपूर्वी हे जोडपे चाकण (Pune Pimpri Crime) येथे आले होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या आईने बुधवारी (दि. 10) रात्री आठच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) दिली होती. बुधवारी दुपारी एक वाजल्यापासून मृत मुलगी आणि तिची बहीण घरात झोपली होती. त्याच वेळी मृत मुलगी कोणाला काहीही न सांगता घराबाहेर पडली. काही वेळानंतर तिचा आजूबाजूला शोध घेतला मात्र ती कोठेच सापडली नाही. त्यामुळे तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी हरवल्याची तक्रार दिली. (Pune Pimpri Crime)

गुरुवारी (दि. 11) सकाळी कंपनीत कामावर जाणाऱ्या लोकांना एका लहान मुलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
यानंतर स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Pimpri Chinchwad CP Ankush Shinde), उपायुक्त मंचक इप्पर (DCP Manchak Ipper), सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे (ACP Prerna Katte) यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे (Senior Police Inspector Vaibhav Shingare) करीत आहेत.

Web Title : –  Pune Pimpri Crime | missing child found dead near chakan pimpri chinchwad pune crime news

हे देखील वाचा :

Pankaja Munde | ’17 ऑगस्टपूर्वीच खातेवाटप, पंकजा मुंडेंना मोठे पद मिळेल’ – गिरीश महाजन

Pune Crime | पोस्कोच्या खटल्यातील वॉरंट बजावून अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी केली झटापट, गाडीसह खाली पाडून गेला पळून

Pune News | नदी पात्रातील रस्त्यावरुन वाहत जाणार्‍या मोटारीतील ५ जणांना वाचविले; अग्निशामक दलाच्या जवानांची कामगिरी

Related Posts