Pune PMC Election 2025 | महापालिका निवडणुकांचे प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर ! 4 सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार; निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता

पुणे : Pune PMC Election 2025 | नगर विकास विभागाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गुरुवारी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले असून अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. यानंतर आरक्षण सोडत होऊन केंव्हाही निवडणुका जाहीर केल्या जातील. दिवाळीपूर्वी शाळांच्या सहामाही परीक्षा असल्याने दिवाळीनंतर पहिल्या आठवड्यात अर्थात ऑक्टोबर अखेरीस अथवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार 11 ते 16 जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी करणे प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, 17 आणि18 जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी करणे, 19 ते 23 जून स्थळ पाहणी करणे , 24 ते 30 जून गुगल मॅप वर प्रभागाचे नकाशे तयार करणे, एक ते तीन जुलै नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागातील जागेवर जाऊन तपासणे. चार ते सात जुलै प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे, आठ ते दहा जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे त्यास राज्य निवडणूक आयोग अथवा आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे,
22 ते 31 जुलै प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती सूचना मागविणे, एक ते 11 ऑगस्ट शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याने प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास पाठविणे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेल्या प्रभाग रचनेच्या शिफारशींवर निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना संबंधित महापालिका आयुक्तांना कळविणे, 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार प्रभाग रचना चार सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडत होईल. त्यानंतर केंव्हाही निवडणुका जाहीर होतील.
Comments are closed.