IMPIMP

Pune PMC News | शहरातील नामफलकांबाबत लवकरच नियमावली ! बेकायदा वीज वापरून उभारलेले ‘आय लव्ह’चे बोर्ड हटविणार – पुणे महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार

by nagesh
Pune PMC News | Strict enforcement of plastic bag ban! On the first day itself, PMC took action against 14 traders and seized 391 KG plastic bags Single Use Plastic Ban

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune PMC News | विविध विकास कामांच्या ठिकाणी नगरसेवकांकडून लावण्यात आलेल्या फलकांवरील विद्युत रोषणाईला मुख्य खात्याकडून मनाई असतानाही, क्षेत्रीय कार्यालयाकडून त्या फलकांना वीज पुरवठा केला जात आहे. तर फलकांच्या आकार, रंगसंगती, संख्या आदींबाबत नियमवाली केली जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (Pune PMC News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महापालिकेच्या विविध विकास कामांना नगरसेवकांडून नातेवाईकांची नावे दिली गेली आहे. यावरून सध्या महापालिका वर्तुळात चर्चा होत आहे. विविध विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी नगरसेवकांकडून संबंधित ठिकाणी विद्युत रोषणाई असलेले अत्याधुनिक फलक लावण्याचा सपाटाही नगरसेवकांनी केला आहे. तसेच आय लव सारसबाग, आय लव कात्रज अशा आशयाच्या फलकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच अनेक ठिकाणी कमानी, दिशा दर्शक फलक, विविध प्रकारचे कट्टे, वाचनालये आदींच्या ठिकाणी असे फलक नगरसेवकांच्या नावासकट झळकत आहे. या फलकांना महापालिकेच्या सार्वजनिक प्रकाश व्यवस्थेतून वीज पुरवठा केला जात आहे. सार्वजनिक दिव्याच्या खांबातून या फलकांसाठी वीज पुरवठा घेतला जात आहे. एकीकडे महापालिका वीज बचतीसाठी लाखो रुपये खर्च करून सल्लागार नियुक्त करीत असतानाच, केवळ नगरसेवकांचे नाव झळकावे यासाठी महापालिकेच्या वीजेचा वापर केला जात आहे. (Pune PMC News)

यासंदर्भात महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल (PMC Shrinivas Kandul) यांच्याशी संपर्क साधला असता,
ते म्हणाले, अशा फलकांना महापालिकेच्या विद्युत विभागाकडून वीज पुरवठा केला जात नाही.
सार्वजनिक दिव्याच्या खांबावरून अशाप्रकारे वीज पुरवठा घेण्यात येऊ नये, भविष्यात अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण स्विकारणार याबाबत क्षेत्रीय कार्यालयांना कळविण्यात आले आहे.
मुख्य खात्याने असा वीज पुरवठा घेण्यास मनाई केली आहे, त्यानंतरही वीज पुरवठा केला जातो असे सांगितले.

महापालिकेच्या विकास कामांना नगरसेवकांच्या (PMC Corporators) नातेवाईकांची नावे दिल्या प्रकरणांची माहीती मागविली जात आहे.
आत्तापर्यंत ७७ प्रकरणे समोर आली आहेत. कायद्यानुसार नावांचा ठराव सर्वसाधारण सभेत होऊ शकत असला तरी यापुर्वी झालेले निर्णय आणि नावासंदर्भात राज्य सरकारकडून आलेल्या आदेशांची तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाईल असेही आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच संकल्पनांच्या फलकांसाठी सार्वजनिक दिव्यांच्या खांबावरील वीज पुरवठा घेणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तर फलकांच्या बाबतीत नवीन नियमावली केली जाईल. या फलकांचे रंग आणि आकार एक सारखेच असतील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :-  Pune PMC News | Rules for nameplates in the city soon I Love Board erected using illegal electricity will be removed Pune Municipal Commissioner and Administrator Vikram Kumar

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! कोकण ट्रिपसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईवर कोयत्याने वार

Jitendra Awhad | ‘शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये, कारण…’ – जितेंद्र आव्हाड

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून वडगावमध्ये युवकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून, परिसरात खळबळ

Related Posts