IMPIMP

Pune PMC Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारी ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune PMC Water Supply | शुक्रवार 24 मे रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, एस.एन.डी.टी टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र व रॉ वॉटर पंपिंग व त्या अंतर्गत येणारा भाग, चिखली जलकेंद्र अशा अनेक ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच शनिवारी (दि.25) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

पर्वती एमएलआर (MLR) टाकी – गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.

पर्वती एचएलआर (HLR) टाकी परिसर – सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग- 1व 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेंसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं 42,46 ( कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,

पर्वती एलएलाआर (LLR) परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.

सिंहगड रस्ता व अंतर्गत समाविष्ट गावे – नऱ्हे, तक्षशिला, दरोडे जोग, धायरी गावठाण, डिएसके विश्व, किरकटवाडी, नांदेड, खडकवासला

एस.एन.डी.टी. (M.L.R.) टाकी परिसर – गोखले नगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी परिसर, रेव्हेन्हू कॉलनी, कोथरूड, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जय भवानी नगर, केळेवाडी, आयडीयल कॉलनी, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी इ.

एस.एन.डी.टी. (H.L.R.) टाकी परिसर – गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, लॉ कॉलेज रोड, बीएमसीसी, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, चतु:श्रृंगी टाकीवरुन होणारा पाणीपुरवठा भाग, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा.भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, दशभूजा गणपती परिसर, नळस्टॉप, सहकारनगर वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच.ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भारतनगर, अर्चनानागर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टँकर पॉईंट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इ. करिष्मा सोसायटी इ.

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर – पाषाण, भूगाव रस्ता, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरूगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहस नगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हण मळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सूस रस्ता इ.

गांधी भवन टाकी परिसर – कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणूकानगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, गोकुळ नगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अर्थव वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क -1, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद, शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मी नगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, आर्चिड लेन 7 व 9, मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कालवा रस्ता इ.

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर – बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर इ.

वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर – कर्वेनगर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11, इंगळे नगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक 1 ते 10
चतु:श्रृंगी टाकी परिसर – औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंध सोसायटी, औंध गाव परिसर

पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर – गणराज चौक, पॅनकार्ड रोड, वीरभद्र नगरचा काही भाग, समर्थ कॉलनीचा काही भाग
जुने वारजे जलकेंद्र भाग – रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळ नगर, पठार, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदिप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इ.

लष्कर जलकेंद्र अंतर्गत येणारा भाग – संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, गोसावी वस्ती, वैदुवाडी, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी, शेवाळवाडी, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवी कडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराई नगर (टँकर द्वारे पाणीपुरवठा बंद)

नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत येणारा भाग – मुळा रस्ता, खडकी कॅन्टोन्मेंट संपूर्ण परिसर, MES, HE Factory, हरीगंगा सोसायटी इ.

जागतिक पाणीपुरवठा योजना, चिखली अंतर्गत भाग – गणेशनगर, म्हस्के वस्ती, विश्रांतवाडी, विमाननगर, संजय पार्क, खराडी, कळस, बारमाशेळ, राजीव गांधी नगर, यमुनानगर, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर, पाराशर सोसायटी श्री पार्क

Pune Rains | पुण्यात चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाची माहिती

Related Posts