IMPIMP

Pune Police | गहाळ झालेले मंगळसूत्र सहकारनगर पोलिसांच्या प्रयत्नाने परत

by nagesh
Pune Police | Missing Mangalsutra returned by Sahakarnagar police

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –   धनकवडी परिसरात हरवलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र पुणे पोलिसांच्या (Pune Police) प्रयत्नामुळे महिलेला परत मिळाले आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune) धनकवडी (Dhankawadi) परिसरात मंगळवारी (दि.17) घडला. महिलेने अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र गहाळ झाल्याची तक्रार सहकारनगर पोलिसांकडे (Sahakarnagar Police, Pune) केली. पोलिसांनी तात्काळ गहाळ झालेल्या मंगळसूत्राचा शोध घेऊन महिलेला परत केले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

प्राचि महेश कांबळे (वय-40 रा. गणेश नगर, धनकवडी) यांचे 1 लाख 15 हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे (Gold) मंगळसूत्र धनकवडी परिसरात गहाळ झाले होते. प्राचि कांबळे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) धाव घेत मंगळसूत्र गहाळ झाल्याची माहिती पोलिसांना दिली. सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (Senior Police Inspector Swati Desai) यांनी पोलिसांना मंगळसूत्र शोधण्याचे आदेश दिले.

सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे (investigation team) अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुधिर घाडगे, पोलीस अंमलदार प्रदिप बेडीस्कर, शिवलाल शिंदे व सागर शिंदे यांनी धनकवडी परिसात मंगळसूत्राचा शोध घेतला. पथकाने दोन तास कसून तपास करुन कांबळे यांचे गहाळ झालेले सोन्याचे मंगळसूत्र अवघ्या दोन तासात शोधले. पोलिसांनी मंगळसूत्र प्राची कांबळे यांच्या ताब्यात दिले. दोन तासात मंगळसुत्र परत मिळवून दिल्याने कांबळे यांनी सहकारनगर पोलिसांचे आभार मानले.

Web Title : Pune Police | Missing Mangalsutra returned by Sahakarnagar police

हे देखील वाचा :

तात्काळ अपडेट करा तुमचा Smartphone, आता हसून उघडू शकता फोनचा कॅमेरा; तोंड उघडल्यावर दिसतील मेसेज

Pune Crime | सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांकडून अटक; पिस्टल, काडतुसे जप्त

Pune Crime | खळबळजनक ! पुणे पोलिस आयुक्तालयात एकाने पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर जखमी

Honey Trap Racket Pune | धक्कादायक ! निवृत्त एअर फोर्स अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटण्याचा प्रयत्न; विमानतळ पोलिसांकडून तिघांना अटक

Related Posts