IMPIMP

Pune Police | …म्हणून पुण्यातील ‘त्या’ पोलिस निरीक्षकास केले महिन्याभरासाठी कंट्रोल रूमशी ‘संलग्न’; पोलिस आयुक्त व सह आयुक्तांच्या कठोर कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Police | माल वाहतूक करणार्‍या ‘पिकअप’ वर कारवाई न करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच (Pune Bribe) घेताना बंडगार्डन वाहतूक विभागाच्या (Bundgarden Traffic Division) पोलीस कर्मचार्‍याला (Pune Police) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) सापळा रचून पकडले होते. आपल्या हाताखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावर प्रभावीपणे नियंत्रण नसल्याने पोलीस खात्याची बदनामी होणारी घटना घडल्याने बंडगार्डन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात (Pune Police Control Room) महिन्याभरासाठी बदली करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve) यांनी हा आदेश काढला आहे. ए. डी. दळवी असे या पोलीस निरीक्षकाचे (Police Inspector A.D. Dalvi) नाव आहे.

याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या नागरिकाने तक्रार दिली होती. बंडगार्डन वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार दिलीप दत्तू फुंदे Dilip Dattu Funde (वय ३४) याने मालवाहतूक करणारी पिकअप अडविली. त्यांच्या गाडीचा इन्शुरन्स (Vehicle Insurance) व रजिस्ट्रेशन (Vehicle Registration) संपल्याचे दिसून आले. त्यामुळे फुंदे याने त्यांची गाडी अडवून ठेवली. त्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी व ‘आरटीओ’ कडे ते वाहन न पाठविण्यासाठी ७ हजारांची लाच मागितली. ‘लाच लुचपत’कडे (Pune ACB) आलेल्या तक्रारीची पडताळणी करताना फुंदे याने तडजोड करुन ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताना शुक्रवारी रात्री फुंदे यांना सापळा रचून पकडण्यात (ACB Trap In Pune) आले होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलीस निरीक्षक ए. डी. दळवी यांच्या अधिपत्याखाली बंडगार्डन वाहतूक विभागात (Pune Traffic Police) कार्यरत होता.
आपल्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
आपले त्यांच्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याने पोलीस खात्याची बदनामी होणारी ही घटना घडली. (Pune Police)

या घटनेमुळे दळवी यांना 1 महिन्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाला बदली (Police Inspector Transfer) करण्यात आली असल्याचे पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (IPS Dr. Ravindra Shisve) यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, यापुर्वीच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर संबंधित पोलिस निरीक्षकास जबाबदार धरण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे एका पोलिस निरीक्षकावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी कारवाई केलेली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Police | Police Inspector in Pune Attached To Pune City Police Control Room For A Month; CP Amitabh Gupta Jt CP Dr. Ravindra Shisve’s Action

हे देखील वाचा :

Pune Crime | कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने बनवले कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरूणीचे इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट; अश्लिल मेसेज नातेवाईकांना पाठवून विनयभंग

Pune Crime | वडगाव शेरी येथील ‘वॉटर बे’च्या मागील मैदानात तरुणावर कोयत्याने वार; तिघा सराईत गुंडांसह 6 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

Chandrakant Patil | ‘शरद पवारांना सुप्रिया सुळेंना थेट मुख्यमंत्री करता येत नसल्याने संजय राऊतांना…’, चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान

Related Posts