IMPIMP

Pune Police | गुन्हे शाखेचा शहरात रिक्षाचालकांविरोधात ‘ड्राईव्ह’, अनेक रिक्षाचालकांवर कारवाई

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुणे शहरामध्ये मुलीवर अत्याचाराच्या घटनेत रिक्षाचालकांचा (rikshaw driver) समावेश असल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) 12 पथकातील साध्या वेशातील महिला कर्मचाऱ्यांनी रिक्षाचालकांची शाळा घेतली. यामध्ये काही रिक्षाचालक पास झाले तर काही रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे शहरात महिलांवर अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये रिक्षाचालकांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर रिक्षा व्यवसायाच्या आडून गुन्हे (Crime) करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेने 12 पथकांची नियुक्ती केली आहे.
या पथकामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस उपनिरीक्षक (PSI) महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकांनी शहरातील पुणे स्टेशन (Pune Station),
विश्रांतवाडी (Vishrantwadi), संगमवाडी (Sangamwadi), स्वारगेट (Swargate), कोथरुड, हडपसर (Hadapsar), वाघोली (Wagholi) परिसरात रात्रीच्यावेळी ड्राईव्ह (Drive) राबवला.

असा राबवला ‘ड्राईव्ह’

पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी निर्मनुष्य ठिकाणी रिक्षाची वाट पाहण्यासाठी उभे करण्यात आले होते.
पुणे शहरातील स्वारगेट,पुणे स्टेशन आणि संगमवाडी परिसरात प्रवाशांची गर्दी कमी असल्याने या भागात महिला पोलिसांनी रिक्षाचालकांना थांबवले.
यावेळी गणवेशात असलेल्या रिक्षा चालकांनी आपुलकीने चौकशी करत आपल्या रिक्षात बसण्यास सांगितले.
तसेच माझा आणि रिक्षाचा फोटो काढून घरी पाठवा, तुमच्या मोबाईलचे लोकेशन (Mobile location) सुरु करा असा संवाद साधून विश्वास संपादित केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रिक्षाचालकांनी घेतला धसका

रिक्षाच्या आडून काही चालकांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुळे पोलीस आणि वाहतूक विभागाकडून रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
वाहतूक पोलीस (pune traffic police) आणि गुन्हे शाखेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे रिक्षाचालकांनी चांगलाच धसका घेतला आहे.
त्यामुळे रात्री-अपरात्री प्रवाशांची ने-आण करताना रिक्षाचालकांची भाषा (Language) आणि वर्तवणूक (behavior) बदलली आहे.

पोलिसांचा ‘मास्टर प्लॅन’ तयार

बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांचा (Pune Police) मास्टर प्लॅन (Master plan) तयार करण्यात आला आहे.
या प्लॅननुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या (police station) हद्दीतील थांब्यावरील बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध ड्राईव्ह राबवून कारवाई केली जात आहे.
या ड्राईव्हमध्ये गणवेश, लायसन्स, बॅचबिल्ला, परमीट, पीयूसी नसलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. ज्या रिक्षाचालकाकडे कागदपत्रे नाहीत त्यांच्यावर गुन्हे (FIR) दाखल करण्यात येत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

प्रवाशांना चांगली सेवा मिळणे महत्त्वाचे – पोलीस उपायुक्त

शहरातील बेशिस्त आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांचे वर्तन तपासण्यासाठी ही विशेष मोहिम हाती घेतली आहे.
या मोहिमेअंतर्गत रात्रीच्यावेळी 12 पथकांकडून शहरातील विविध रिक्षा स्थानक परिसरात साध्या वेशात महिला अधिकाऱ्यांसह महिला कर्मचारी ड्राईव्ह राबवत आहेत.
यामध्ये अनेक रिक्षाचालकांचे वर्तन चांगले असल्याचे दिसून आले.
रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचा आमचा उद्देश नसून प्रवाशांना चांगली सेवा मिळावी हे महत्त्वाचे असल्याचे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांनी म्हटले आहे.

Web Title : Pune Police | Pune Police Crime Branch’s drive against rickshaw pullers in the city, action against several rickshaw pullers

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | हसन मुश्रीफांना कुणीही वाचवू शकणार नाही – किरीट सोमय्या

Online Rummy | हायकोर्टचा मोठा निर्णय; म्हणाले – ‘ऑनलाइन रमी एक कौशल्यपूर्ण खेळ, यावर बंदी घालणे असंवैधानिक’

Amravati Crime | धक्कादायक ! 15 वर्षीय मुलीवर गावातल्याच तरुणाने केला अत्याचार

Related Posts