Pune Rain Update | पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता; पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती कशी असेल? जाणून घ्या

पुणे : Pune Rain Update | मे महिन्याच्या अखेरीस राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा लपंडाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात कधी ऊन पडते, तर कधी आकाश भरून येत असल्याचे दिसते. मंगळवारी (१० जून) राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासांत कमाल तापमान ३२ अंशांवर राहील. हवामान खात्याने वादळासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे परिसरात वादळासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत सांगली जिल्ह्यात कमाल तापमान ३०.७ अंशांवर राहिले. तसेच ०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील २४ तासांत सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
साताऱ्यात पारा ३१.६ अंश सेल्सिअसवर राहिला. पुढील २४ तासांत सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसवर राहील. जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता अजूनही आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान ३३.३ अंशांवर राहिले. गेल्या २४ तासांत ७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तथापि, पुढील २४ तासांत तापमानात वाढ होऊन पारा ३५ अंशांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने ढगाळ आकाश आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम पावसाचा इशारा जारी केला आहे.
कोल्हापूरमधील कमाल तापमान ३०.६ अंशांवर राहिले आहे. पुढील २४ तासांत कोल्हापूरमधील कमाल तापमान ३३ अंशांवर स्थिर राहील. पुढील २४ तासांत ढगाळ आकाशासह एक किंवा दोन हलक्या पावसाची शक्यता आहे.